AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संपूर्ण रुममध्ये ज्वलनशील पदार्थ पसरले… मुलांच्या डोळ्यांवर पट्ट्या बांधल्या… काय घडणार होतं त्या चार भिंतीत? रोहित आर्याचा हादरवून टाकणारा खतरनाक प्लान काय होता?

आरए स्टुडिओमध्ये तब्बल 17 मुलांना ओलीस ठेवल्याची माहिती मिळताच पोलिस अलर्ट झाली. मुंबई पोलिसांनी काही वेळातच पवईतील आरए स्टुडिओ गाठत मुलांना सुरक्षित बाहेर काढले. रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने हे घडवून आणले होते. त्याचा खळबळजनक प्लॅन होता.

संपूर्ण रुममध्ये ज्वलनशील पदार्थ पसरले... मुलांच्या डोळ्यांवर पट्ट्या बांधल्या... काय घडणार होतं त्या चार भिंतीत? रोहित आर्याचा हादरवून टाकणारा खतरनाक प्लान काय होता?
Rohit Arya
| Updated on: Oct 31, 2025 | 2:47 PM
Share

रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने मुंबईतील पवई भागातील आरए स्टुडिओमध्ये तब्बल 17 मुलांना ओलीस ठेवले. त्याच्या काही मागण्यांसाठी त्याने हा प्रकार केला. शिक्षण विभागामध्ये त्याचे काही पैसे अडकल्याचे त्याने सांगितले. सतत तो फोनवर बोलत होता. पवई पोलिस त्याच्यासोबत संवाद साधत होते. मात्र, त्याने आपले म्हणणे स्पष्ट मांडले नसल्याचेही सांगितले जातंय. आता एक अंगावर काटा आणणारी माहिती पुढे आली असून मोठी खळबळ उडालीये. रोहित आर्या याने एक खतरनाक असा प्लॅन आखला होता. जर थोडा जरी उशीर झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता.

नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, रोहित आर्याने मुलांना आपण किडनॅपिंग सीन शूटिंग करणार आहोत असे सांगितले होते. मुलांना बंदूक, ज्वलनशील पदार्थ दाखवत यात तुम्हाला एक्टिंग करायची आहे असे सांगितले होते. काही मुलांच्या तोंडावर पट्ट्याही मारल्या होत्या, जेणेकरून हा सिन खरा वाटावा. मात्र, त्यानंतर आर्याने खऱ्या किडनॅपिंग सुरुवात केली. मुलांना सुरूवातीला याची अजिबातच काही कल्पना नव्हती.

26 तारखेला आलेल्या मुलांची संख्या जवळपास 36 होती, त्यापैकी दुसऱ्या दिवशी सिलेक्ट झालेली 23 मुल हजर होती. कालच्या ऑडिशनला १७ मुले शिल्लक राहिलेली होती.  रोहितने स्टुडिओच्या आतमध्ये एकूण पाच नवीन कॅमेरे स्वतः बसवले होते. तर सोसायटीच्या काही कॅमेऱ्यांचा एक्सेस रोहितने मिळवला होता, ज्याधारे तो पोलीस आणि इतर लोकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होता. सर्व रूममध्ये रोहितने ज्वलनशील पदार्थ पसरवून ठेवले होते.

रोहितने स्टुडिओच्या सर्व भागात ह्युमन सेन्सोरची यंत्रणा ऐक्टिव्हेट केली होती, जेणेकरून त्याला प्रत्येक हालचालीचा अलर्ट येत होता. एखाद्या सिनेमाच्या स्क्रिप्टप्रमाणेच रोहितने हे सगळं प्लॅनिंग केल होत असा पोलिसांचे म्हणणं आहे. पोलिसांना याबद्दलची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले आणि अत्यंत हुशारीने बाथरूमच्या खिडकीतून स्टुडिओमध्ये प्रवेश केला. पोलिसांनी सर्व मुलांना व्यवस्थित बाहेर काढले. यादरम्यान पोलिसांनी मारलेला गोळीमध्ये रोहित आर्या याचा मृत्यू झाला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...