ओलीस धरलेली मुले रोहित आर्यासोबत किती दिवस होती? कुठून कुठून आले होते? मोठी अपडेट समोर
मुंबईतील पवई भागातील आरए स्टुडिओमध्ये धक्कादायक घटना घडली आणि राज्यभरात खळबळ निर्माण झाली. रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने तब्बल 17 मुलांना ओलीस ठेवले. त्यानंतर आता धक्कादायक अशी माहिती पुढे येतंय.

मुंबईतील पवई भागात घडलेल्या घटनेने मोठी खळबळ उडाली. रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने आरए स्टुडिओमध्ये मुलांना ओलीस ठेवले. फक्त ओलीसच नाही तर त्याने मुलांना मारण्याचीही धमकी व्हिडीओच्या माध्यमातून दिली. त्याने सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडीओ शेअर केला. मुलांच्या पालकांना धमकीचे व्हिडिओ पाठवण्यात आले. पोलिसांनी मागच्या दाराने बाथरूमच्या खिडकीतून शिरून मुलांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला आणि सर्व मुलांना सुरक्षित काढण्यात आले. रेस्कु केलेल्या सर्व मुलांना रुग्णालयात तपासणी करण्यासाठी नेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रोहित आर्यच्या हाताला गोळी लागली त्यानंतर रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
मुळात म्हणजे सर्व प्लॅनिंग रोहित आर्या याने पूर्ण विचार करून केली होती. फक्त मुंबईच नाही तर राज्यातील विविध ठिकाणांहून हे मुले आरे स्टुडिओमध्ये पोहोचली होती. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, रोहित आर्या याचे खरे नाव रोहित हारोलीकर अस असल्याचे त्याच्या सोसायटीतील लोकांनी सांगितले. पुण्यातील कोथरूड भागातील स्वरांजली सोसायटीमध्ये रोहित आर्याचे आई वडील राहत असल्याचीही माहिती पुढे येतंय.
या घटनेनंतर 16 मुलांचे मेडिकल चेकअप करून त्यांना सुखरूप त्यांच्या घरी पालकांसोबत पाठवण्यात आले आहे. नांदेड ,पुणे ,पनवेल आणि मुंबई येथील मुलांचा समावेश होता. सर्व सुखरूप आहेत ,कोणी घाबरलेले नाही. सर्वांची मेडिकल रिपोर्ट करण्यात आली. पोलिसांनी मुलांची स्टेटमेंट रुग्णालयात घेतली आहेत. त्यांचे फोन नंबर घेतले असून पोलिस पुढील तपास करत आहेत, अशी माहिती आमदार मुराजी पटेल यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, पाच दिवसापासून शूटिंग सुरू होती. रोहित आर्याने कट रचला होता असे पालकांचे मत आहे. 5 नांदेडची मुले होती. 2 ते 3 मुले पुणे आणि काही ठाण्याचे देखील होते. रोहित आर्याने मुलांना धमकावले नव्हते, त्यांना कोंडून ठेवले होते. यादरम्यान मुले घाबरली होती. एन्काऊंटर मुलांनी बघितला नाही.
आरए स्टुडिओच्या घटनास्थळी मुंबई पोलिसांची फॉरेन्सिक टीम आहे. क्राईम सिनवर फॉरेन्सिक टीमकडून अजूनही काम सुरू. गुन्हे शाखेचे काही अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम त्या हॉलमध्ये अजूनही तपासणी करतायत. रोहित आर्याच्या एनकाउंटरनंतर 20 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली होती, ज्यात 17 लहान मुलांचा समावेश आहे. सध्या घटनास्थळी तपास केली जात असून फॉरेन्सिक टीमकडून रोहित आर्याने हॉलमध्ये मुलांना बंदिस्त बनवून ठेवण्यासाठी काय काय आणून ठेवलं होत याची तपासणी कालपासून केली जात आहे. काही ज्वलनशील पदार्थ आर्याने आधीच स्टुडिओमध्ये आणले होते अशी माहिती पोलिसानी दिलेली होती.
