कपल कॉर्नरमध्ये रोमान्स, थिएटरमध्ये धाड टाकून आठ जोडपे ताब्यात

या जोडप्यांकडून सिनेमागृहात अश्लील चाळे केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी सापळा रचून सिनेमागृहात प्रवेश केला आणि 10 युवक, युवतींना ताब्यात घेतलं, तर काही जण फरार झाले.

कपल कॉर्नरमध्ये रोमान्स, थिएटरमध्ये धाड टाकून आठ जोडपे ताब्यात

धुळे : महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थींनीनी सिनेमासाठी जाणं सध्या काही नवीन नाही. पण धुळ्यात सिनेमागृहात अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या जोडप्यांकडून सिनेमागृहात अश्लील चाळे केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी सापळा रचून सिनेमागृहात प्रवेश केला आणि 10 युवक, युवतींना ताब्यात घेतलं, तर काही जण फरार झाले.

धुळ्यातील ज्योती सिनेमागृहातील हा प्रकार आहे. शहरातील या थिएटरमध्ये जोडप्यांना 200 रुपये प्रति तास या प्रमाणे विशेष बॉक्सची सोय करुन देण्यात आली होती. या जागेवर जोडपी अश्लील चाळे करत होते. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु असल्याचं पोलिसांना समजलं होतं. याची माहिती दामिनी पथकाला मिळाली आणि मग सापळा रचून कारवाई करण्यात आली.

पोलीस दलातील एक महिला आणि पुरुष कर्मचाऱ्याने बनावट जोडपं म्हणून थिएटरमध्ये प्रवेश केला. मिळालेल्या माहितीची खातरजमा करताना या जोडप्यांकडून अश्लील चाळे केले जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आणि पोलिसांनी तातडीने कारवाई केली. एकूण आठ जोडपे म्हणजे आठ तरुणी आणि आठ तरुण होते. यापैकी सहा जण पळून गेले, तर 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI