गणेश नाईकांनी घेतली प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबाची भेट

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरु असून. मंत्री गणेश नाईक हे पूर्णेकरांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी काय म्हटलं आहे, जाणून घ्या..

गणेश नाईकांनी घेतली प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबाची भेट
ganesh naik news
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 02, 2026 | 6:50 PM

ठाण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. त्यांची हत्या झाल्यानंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. त्यानंतर ठाण्यात वातावरण तापलं होतं. खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरेंनी ठाण्यात हजेरी लावली होती. त्यांनी कुटुंबियांची भेट घेतली होती. सांत्वनपर भेट घेण्यासाठी गेल्यानंतर कुटुंबियांचा आक्रोश पाहायला मिळाला होता. यावेळी मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पत्नीवर आरोप करण्यात आले होते. दरम्यान, आता भाजपचे मंत्री गणेश नाईकांनी पूर्णकरांच्या कुटुंबियांची भेट घेतली असून तो एक सामाजिक कार्यकर्ता होता. पक्षाचा विषय येत नाही असं त्यांनी म्हटलं आहे. नाईकांनी या प्रकरणावर आधीही भाष्य केलं होतं. दरम्यान, या प्रकरणी दोन आरोपींना 8 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

तो सामाजिक कार्यकर्ता होता

प्रदीप पुर्णेकर हा कोणत्या पक्षाचा होता. यापेक्षा तो सामाजिक कार्यकर्ता होता. यामध्ये ज्या गोष्टी समोर येत आहेत, त्यात कुटुंबाने अनेक गोष्टी मांडल्या आहेत,अनेक जण अटक झाले आहेत, खोलवर तपास होईल, मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिले आहे. खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होणार असे हे शासन आहे. राजकीय संघर्ष असायला हवा जीव घेणारा संघर्ष नसायला हवा. सांत्वन म्हणजे आपण एकदा आलो म्हणजे दुःख दूर होणार नाही. यात कोण सूत्रधार असतील त्यांना कायद्याच्या कक्षे मध्ये येऊन शिक्षा होईल.

Loading...

मीनाक्षी शिंदे यांच्या पत्रकार परिषदेवर बोलताना ते म्हणाले की, शेवटी सत्य कधी तरी उजेडात येत. वरच्या दरबारात कोणी सुटत नाही. सजा मिळेल. या घटना घडल्या यात विविध अँगल आहेत. या घटना वाईट आहेत. पोलीस यंत्रनाने सतर्क व्हायला हवे. हा माझा मतदार संघ होता. मी शिवसेनेत असल्या पासून माझे पुर्णेकर यांच्या सोबत सबंध आहे.

हत्येमागचं कारणावर बोलताना त्यांनी सांगितलं की, “तीन चार कारणे दाखवली गेली, महत्वाचं म्हणजे विकास कामं होणार ती दाखवली. ड्रग्स बाबत झाली असे पण कारण आहे. पण खरं कारण तपासानंतरच पुढे येईल, असं यावेळी गणेश नाईकांनी म्हटलं आहे.

राऊतांनी केलेलं आवाहन

संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की गणेश नाईक ठाण्यातील गुंडगिरीविरुद्ध जाहीरपणे बोलत आहेत. त्यांनी पूर्णेकरांच्या कुटुंबियांची भेट घेतली पाहिजे. त्यांच्या मुलीचा, पत्नीचा, मुलाचा आक्रोश पाहावा, त्यांच्या घरी गेलं पाहिजे, असं म्हटलं होतं. यावेळी त्यांनी असंही म्हटलं होतं की गुंडगिरीविरुद्ध मोहिम राबवण्याचं आणि ठाण्याचं नेतृत्व करण्याच आवाहनही केलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us