AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मानवी तस्करीचा प्रकार, प्रांजल खेवलकर प्रकरणात महिला आयोगाचा थेट दावा, नाथाभाऊंच्या जावयाचे पाय खोलात?

पुणे पोलिसांनी खराडी भागात छापेमारी करत थेट एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर याला अटक केली. प्रांजल खेवलकर सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याच्यावर सातत्याने गंभीर आरोप होताना दिसत आहेत. पतीसाठी रोहिणी खडसे मैदानात उतरल्या आहेत. मात्र, आता खळबळजनक आरोप करण्यात आली आहेत.

मानवी तस्करीचा प्रकार, प्रांजल खेवलकर प्रकरणात महिला आयोगाचा थेट दावा, नाथाभाऊंच्या जावयाचे पाय खोलात?
Pranjal Khewalkar
| Updated on: Aug 10, 2025 | 9:53 AM
Share

एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. पुण्यातील खराडी भागात रेव्ह पार्टी करत असताना त्यांना रंगेहात पोलिसांनी पकडले. ज्यानंतर सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. खेवलकर हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. जामिनासाठी मार्ग मोकळला असताना देखील खेवलकरच्या जामिनासाठी अर्ज कोर्टात दाखल करण्यात आला नाहीये. यादरम्यानच्या घडामोडीमध्ये रोहिणी खडसे यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली होती. या रेव्ह पार्टीमध्ये आता राज्य महिला आयोगाने देखील उडी घेतलीये.

राज्य महिला आयोगाने पुण्यातील रेव्ह पार्टीचा अहवाल पोलिसांकडून मागवला आणि त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी काही धक्कादायक आरोप हे प्रांजल खेवलकरवर केली आहेत. महिलांना पार्टीमध्ये बळजबरी आणि चित्रपटांमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून आणले जायचे आणि त्यांच्यावर अत्याचार केली जात असल्याची रूपाची चाकणकर यांनी म्हटले यामुळे या केसला एक वेगळेच वळण मिळालंय. पुण्यातील रेव्ह पार्टीमध्ये काही महिलांना देखील पोलिसांनी अटक केली.

आता प्रांजल खेवलकर प्रकरणात महिला आयोगाने थेट पोलिस महासंचालकांना पत्र पाठवले आहे. हे सर्व प्रकरण मानवी तस्करीचा प्रकार असल्याचा दावा महिला आयोगाकडून करण्यात आलाय. याबाबतची चाैकशी करण्याची मागणी देखील महिला आयोगाने केलीये. सखोल चाैकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. महिलांना दबाब टाकून पार्टीसाठी बोलावले का? याची चाैकशी करा, असं महिला आयोगाने म्हटले आहे.

मानवी तस्करीचा दावाच थेट महिला आयोगाकडून करण्यात आल्याने आता मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. आता महिला आयोगाच्या या दाव्यानंतर प्रांजल खेवलकरच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जावयामुळे आपल्यावर सतत आरोप होत असल्याने एकनाथ खडसे याबद्दल बोलताना अगदी स्पष्ट दिसले. मी किंवा रोहिणी ताईंनी त्याला हे करायला सांगितले नव्हते. शिवाय तुमचा मुलगा घराबाहेर पडल्यावर काय करतो हे तुम्हाला तरी माहिती असते का? असे थेट एकनाथ खडसे यांनी म्हटले होते.

दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली.
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.