… तर आघाडी सरकार केंद्रामध्ये उचलून ठेवा; प्रसाद लाड यांचा टोला

कोरोना लसीच्या वितरणाचा खर्च केंद्र सरकारने करण्याची मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. (prasad lad slams rajesh tope over corona vaccine distribution)

... तर आघाडी सरकार केंद्रामध्ये उचलून ठेवा; प्रसाद लाड यांचा टोला
प्रसाद लाड
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 11:39 AM

रत्नागिरी: कोरोना लसीच्या वितरणाचा खर्च केंद्र सरकारने करण्याची मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. त्यावर भाजप नेते, आमदार प्रसाद लाड यांनी टीका केली आहे. राज्य हम चलायेंगे, मलाई भी हम खायेंगे, असं सध्या आघाडी सरकारचं सुरू आहे. या सरकारने लसीच्या वितरणाचा खर्च केंद्राने करण्याची मागणी करण्यापेक्षा राज्यातील आघाडी सरकारच केंद्रात उचलून ठेवावं, असा टोला प्रसाद लाड यांनी लगावला आहे. (prasad lad slams rajesh tope over corona vaccine distribution)

रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रसाद लाड यांनी हा टोला लगावला. राज्य हम चलायेंगे आणि मलाई भी हम खायेंगे, असं चालणार नाही. आघाडी सरकारचं सध्या असंच काही सुरू आहे. केंद्रानेच लसीच्या वितरणाचा खर्च करण्याची मागणी करण्यापेक्षा हे सरकारचं केंद्रात उचलून ठेवा ना, असा टोला लाड यांनी लगावला.

चंद्रकांतदादांना पाडणं अशक्य

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र येऊन चंद्रकांत पाटलांविरोधात लढले तरी चंद्रकांतदादांना पाडणं अशक्य आहे. तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढल्याने काहीच फायदा होणार नाही, असं त्यांनी सांगितलं. मनपा निवडणूक असो किंवा कोणतीही निवडणूक असो, कोल्हापुरातील चंद्रकांत पाटलांची ताकद काय आहे हे त्यांना कळेलच, असंही ते म्हणाले.

सुडाचं राजकारण सुरू

यावेळी त्यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी बजावलेल्या नोटीशीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सध्या आघाडीचं सुडाचं राजकारण सुरू आहे, असं ते म्हणाले. सरकारच्या या कारवाईचा मी निषेध करतो. 2009 मधील हे प्रकरण आहे. मुंबई महापालिकेत कोणताही घोटाळा झालेला नाही. यापूर्वी प्राथमिक चौकशी झाली असून त्यात माझ्याविरोधात काहीही तथ्य आढळलेलं नाही. तरीही मी त्याला उत्तर देणार आहे. ही केस स्कॉशिंग करण्यासाठी न्यायालयाला विनंती करणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (prasad lad slams rajesh tope over corona vaccine distribution)

संबंधित बातम्या:

आता नाकातून कोरोनाची लस, इंजेक्शनची गरज नाही; नागपूरमध्ये होणार ट्रायल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बेनामी मालमत्तेची माहिती लपवली, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Rajesh Tope | एका राज्यात एका लसीला परवानगी द्या, राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी

(prasad lad slams rajesh tope over corona vaccine distribution)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.