आता नाकातून कोरोनाची लस, इंजेक्शनची गरज नाही; नागपूरमध्ये होणार ट्रायल

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशात अवघ्या आठ दिवसांत लसीकरण सुरू होणार आहे. (India could get nasal vaccine against Covid-19 soon)

आता नाकातून कोरोनाची लस, इंजेक्शनची गरज नाही; नागपूरमध्ये होणार ट्रायल
कोरोनाची लक्षणे असूनही रिपोर्ट निगेटिव्ह, जाणून घ्या काय आहेत कारणे?

नवी दिल्ली: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशात अवघ्या आठ दिवसांत लसीकरण सुरू होणार आहे. त्यासाठी भारत सरकारने दोन इंजेक्शनच्या वापरासाठी परवानगीही दिली आहे. असे असले तरी आता नाकातून लस (नेझल स्प्रे) देण्यासाठीही संशोधन सुरू करण्यात येत आहे. कोरोनाचं इंजेक्शन घेण्याची गरज पडू नये म्हणून नाकातून स्प्रे देण्यासाठी संशोधक कामाला लागले आहेत. त्यामुळे लवकरच ही नेझल व्हॅक्सीन देशवासियांसाठी उलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (India could get nasal vaccine against Covid-19 soon)

भारत बायोटेक ही नेझल व्हॅक्सीन तयार करणार आहे. सध्या देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींना मंजुरी देण्यात आली आहे. ही दोन्ही इंजेक्शने हातावर देण्यात येतात. मात्र, इंजेक्शन ऐवजी नाकातून स्प्रे सोडण्यावर संशोधकांनी संशोधन सुरू केलं आहे. नागपूरमध्ये त्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या फेजची ट्रायल होणार असल्याचं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे.

भारत बायोटेकने वॉशिंग्टन विद्यापीठाशी करार केला आहे. या नव्या नेझल व्हॅक्सिनचा केवळ एकच डोस घ्यावा लागणार आहे. संशोधनानुसार हा सर्वात चांगला पर्याय आहे, असं भारत बायोटेकचे डॉ. कृष्णा इल्ला यांनी सांगितलं. येत्या दोन आठवड्यात नेझल व्हॅक्सिनचा ट्रायल सुरू केला जाणार आहे. ही नेझल व्हॅक्सिन इंजेक्शनपेक्षाही अत्यंत परिणामकारक आहे. त्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. बोयोटेक लवकरच या व्हॅक्सिनच्या ट्रायलसाठी डीसीजीआयकडे प्रस्ताव ठेवेल, असं डॉ. चंद्रशेखर यांनी सांगितलं.

पुण्यातही ट्रायल

मिळालेल्या माहितीनुसार, केवळ नागपूरच नव्हे तर भुवनेश्वर, पुणे आणि हैदराबादमध्येही या व्हॅक्सिनचे ट्रायल होणार आहे. या शहरांमधील 18 ते 65 वयोगटातील एकूण 40-45 स्वंयसेवकांची निवड केली जाणार आहे. विशेष म्हणजे भारत बायोटेक अजूनही दोन इंट्रा नेझल व्हॅक्सिनवर काम करत आहे. दोन्ही व्हॅक्सिन अमेरिकेच्या आहेत.

नेझल व्हॅक्सिन म्हणजे काय?

कोरोनाच्या दोन व्हॅक्सिनला मंजुरी देण्यात आली आहे. या दोन्ही व्हॅक्सिन हातावर टोचण्यात येणाऱ्या आहेत. नेझल व्हॅक्सिन मात्र नाकातून सोडली जाणार आहे. नाकातूनच व्हायरसचा फैलाव होण्याचा सर्वाधिक धोका असल्याने नाकातून देण्यात येणारी ही लस परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे. कोणतीही लस नाकातून दिल्यास शरीरात इम्यून रिस्पॉन्स चांगला वाढतो. त्यामुळे नाकाद्वारे येणारे सर्व प्रकारचे इन्फेक्शन रोखले जातात, असं वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसीनच्या अभ्यासातून दिसून आलं आहे.

ही लस गेम चेंजर ठरणार?

नाकातून देण्यात येणाऱ्या लसीला मंजुरी मिळाल्यास ही लस कोरोनाच्या लढाईत गेम चेंजर ठरू शकते. इंजेक्शन टोचल्यावर केवळ मानवी शरीरातील यकृताचा खालचा भागच सुरक्षित होतो. परंतु, नाकातून लस सोडल्यास यकृताचा वरचा आणि खालचा दोन्ही भाग सुरक्षित होतो. सध्याच्या व्हॅक्सिनपेक्षा नाकातून देण्यात येणारी लस कमी धोकायदायक आहे. मानवी शरीरावर तिचा लवकर परिणाम दिसून शकतो. (India could get nasal vaccine against Covid-19 soon)

 

संबंधित बातम्या:

भारतात कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या दीड लाखांवर, नव्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली

 काऊंटडाऊन सुरु, देशभरात कोरोना लसीकरणाची तारीख ठरली

सीरम आणि भारत बायोटेकच्या वादावर पडदा, दोन्ही संस्थांचा लसनिर्मितीसाठी काम करण्याचा निर्धार

(India could get nasal vaccine against Covid-19 soon)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI