AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीरम आणि भारत बायोटेकच्या वादावर पडदा, दोन्ही संस्थांचा लसनिर्मितीसाठी काम करण्याचा निर्धार

भारत बायोटेक आणि सीरम इनस्टिट्यूटनं एकत्रितपणे प्रसिद्धीपत्रक जारी करुन वाद मिटल्याचं जाहीर केलेय. (Adar Poonawala Krishna Ella)

सीरम आणि भारत बायोटेकच्या वादावर पडदा, दोन्ही संस्थांचा लसनिर्मितीसाठी काम करण्याचा निर्धार
अदर पुनावाला
| Updated on: Jan 05, 2021 | 4:47 PM
Share

मुंबई : ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडियानं शनिवारी सीरम इनस्टिट्यूटच्या(Serum Institute) कोविशील्ड लसीला आपत्कालीन वापराला मंजुरी दिली. रविवारी भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोवॅक्सिन आणि झायडस कॅडिलाच्या लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली होती. केंद्राकडून कोरोना लसीच्या वापराला मंजुरी दिल्यानंतर भारतातील सीरम इनस्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. अदर पुनावाला (Adar Poonawala) यांनी नाव न घेता भारत बायोटेकला टोला लगावला होता. त्यानंतर भारत बायोटेकनेही सीरमला प्रत्युत्तर दिलं. मात्र, आता दोन्ही संस्थांनी वादावर पडदा टाकला असून कोरोना लसीकरणासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार केला आहे. (Adar Poonawala Krishna Ella published joint statement that Serum and Bharat Biotech work together)

सीरम इनस्टिट्यूट आणि भारत बायोटेककडून संयुक्त प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. सीरमकडून अदर पुनावाला आणि भारत बायोटेकचे डॉ.कृष्णा एल्ला (Krishna Ella) यांनी दोन्ही संस्थांच्या लसीला मंजुरी देण्यात आलीय. दोन्ही संस्थांनी याचं स्वागत केलेय. दोन्ही लसींचा वापर जगातील नागरिकांसाठी केला जाईल, असं म्हटलंय.

लस निर्मितीचं आव्हान

कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या काळात लसीची निर्मिती आणि पुरवठा कसा करायचा, हे आव्हान दोन्ही संस्थांपुढे आहे. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी दोन्ही संस्था काम करत आहेत. कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला भारतात मंजुरी देण्यात आली आहे. आता दोन्ही संस्था कोरोना लसींच्या निर्मितीवर लक्ष देतील आणि एकत्रितपणे काम करतील, असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

कोरोना लसीची गरज मोठ्या प्रमाणावर आहे. मोठ्या लोकसंख्येला उच्च प्रतींच्या लसींचा पुरवठा करणं उद्दिष्ट आहे. त्यावरच दोन्ही संस्थांचे लक्ष आहे. प्रसिद्धीपत्रकात दोन्ही कंपन्यानी एकमेंकांच्या कामाचं कौतुक केलं आहे. दोन्ही संस्थामंध्ये गैरसमजुतीनं वाद निर्माण झाला होता. त्यावर पडदा टाकण्यात आला आहे.

वादाला सुरुवात का?

अदर पुनावाला यांनी कोविशील्डच्या लसीला मंजुरी मिळाल्यानंतर जगात फक्त फायझर, मॉडर्ना आणि ऑक्सफर्ड अ‌ॅस्ट्राजेनेका यांच्या लसींचं फक्त उपयुक्त आहेत, इतर लसी पाण्यासारख्या आहेत, असं म्हटलं होते. त्यानंतर भारत बायोटेकने त्यांची भूमिका जाहीर केली होती.

संबंधित बातम्या:

सरकारने सीरम लसीसाठी केली 6.6 कोटींची डील, 200 रुपयांना मिळणार एक डोस

Corona Vaccine | लस श्रीमंतांना परवडेल, पण गरिबांचं काय? राजेश टोपेंचा सवाल

(Adar Poonawala Krishna Ella published joint statement that Serum and Bharat Biotech work together)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.