AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Vaccine | लस श्रीमंतांना परवडेल, पण गरिबांचं काय? राजेश टोपेंचा सवाल

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना लसीचं ड्राय रन घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. (Rajesh Tope corona vaccine)

Corona Vaccine | लस श्रीमंतांना परवडेल, पण गरिबांचं काय? राजेश टोपेंचा सवाल
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
| Updated on: Jan 05, 2021 | 2:20 PM
Share

मुंबई: केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासोबत 7 जानेवारीला बैठक होणार आहे. या बैठकीत गरिबांना मोफत लस देण्यासाठी केंद्राने मदत करावी, अशी मागणी करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितले. जर केंद्राने तसे केले नाही तर राज्यातील अखत्यारीतील लोकांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. श्रीमंत लोक कोरोना लसीसाठी खर्च करु शकतात मात्र, गरिबांवर 500 रुपयांचा खर्च लादणं योग्य नाही, असं टोपे म्हणाले. राज्याकडे ज्या गोष्टींची कमतरता आहे, त्याची माहिती आम्ही केंद्राला सांगितली आहे. लोकल बाबात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं राजेश टोपे म्हणाले. (Rajesh Tope said central govt should provide free corona vaccine to poor)

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 8 जानेवारीला ड्राय रनचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. महाराष्ट्रात 2 जानेवारील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबारमध्ये ड्राय रन पार पडले होते. महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचं ड्राय रन होणार आहे. त्यामध्ये टेस्टिंग होईल, त्यामुळे जेव्हा प्रत्यक्षात लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जाईल तेव्हा कुठलीही अडचण न येणार नाही, असं राजेश टोपे म्हणाले. कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरळीतपणे राबवता यावा म्हणून ड्राय रन घेण्यात येत आहे, असं राजेश टोपेंनी सांगितले.

सर्वांनी काळजी घेण्याची गरज

नव्या विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रात नव्या कोरोनाचे 8 रुग्ण आढळले आहेत. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या अहवालानुसार नवीन विषाणू झपाट्याने पसरतो. त्यामुळे सर्वांनी अधिक सतर्क राहणे, काळजी घेणं महत्त्वाचं, पण घाबरण्याची गरज नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. कोरोना विषयक नियम जनहितासाठी बनवण्यात आले आहेत. एक आदर्श नागरिक म्हणून त्यांनी ते पाळले पाहिजे, कायदा हा सर्वांसाठी समान आहे, कायद्याच्या वर कोणीही नाही, याचा विचार करुन सर्वांनी वागलं पाहिजे,असंही राजेश टोपे म्हणाले.

राज्याचा रिकव्हरी रेट 96 टक्केंवर

महाराष्ट्रात सध्या दिवसाला 2 ते 3 हजार नवीन रुग्ण आढळतत आहेत. राज्यात काही दिवसांपूर्वी दर दिवशी 25 ते 30 हजार रुग्ण आढळत होते. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 96 टक्के आहे. कोरोनाच्या नव्या अवताराबाबत आम्ही सतर्क आहोत. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी ब्रिटनहून आलेल्या विमानांमधून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेतला.

आम्ही आमच्या प्रोटोकॉलनुसार अंमल बाजावणी कायम ठेवणार, तसे आम्ही केंद्राशी पत्र व्यवहारकरून इतर राज्यात देखील प्रोटोकॉल कायम राहावे, यासाठी सांगण्यात येणार जेणेकरून इतर राज्यातून आपल्या राज्यात रूग्ण संख्या वाढू नये,असं राजेश टोपे म्हणाले.

Live : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/TZfojWjmJJ

संबंधित बातम्या:

कोरोनाचा नवा अवतार अधिक संसर्गजन्य, काळजी घ्या- आरोग्यमंत्री

विमानात एक कोरोनाबाधित आढळल्यास त्या रांगेतील सर्वच प्रवासी होणार क्वॉरंटाईन!

(Rajesh Tope said central govt should provide free corona vaccine to poor)

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.