भारतात कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या दीड लाखांवर, नव्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली

भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाख 50 हजारांच्यावर गेली आहे. ( India corona )

भारतात कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या दीड लाखांवर, नव्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली
corona virus pune

नवी दिल्ली: भारतासह संपूर्ण जगात कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे. कोरोनाच्या नव्या अवतारामुळं ब्रिटन, जर्मनीमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आले आहे. भारतातील कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येंने दीड लाखांचा टप्पा पार केल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. मंगळवारी भारतात कोरोनामुळे 264 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 1 लाख 50 हजार 114 वर पोहोचली आहे. (India is third country to record one lakh fifty thousand deaths due to corona)

कोरोना मृत्यूंच्या संख्येत भारत तिसऱ्या स्थानावर

कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेमध्ये आतापर्यंत 3 लाख 65 हजार 620 जणांनी जीव गमावला आहे. दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील असून तिथे 1 लाख 97 हजार 777 जणांचा मृत्यू झालाय. भारतामध्ये आतापर्यंत 1 लाख 50 हजार 114 जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे ट्विट

भारतात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मंगळवारी (5 जानेवारी) ला 16 हजार 375 कोरोना रुग्ण समोर आले आहेत. हा गेल्या काही महिन्यामंधील सर्वात कमी आकडा आहे. भारतातील अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सलग 16 व्या दिवशी सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखांपेक्षा कमी राहिली आहे.

भारतातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 96.35 टक्केंवर पोहोचला आहे. मंगळवारी देशभरात 21 हजार 314 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत देशातील 99 हजार 97 लाख 272 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत 10 व्या स्थानावर आहेत.

दरम्यान, भारतात नव्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या 71 वर पोहोचलीय, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

संबंधित बातम्या:

Corona Vaccine | काऊंटडाऊन सुरु, देशभरात कोरोना लसीकरणाची तारीख ठरली

सरकारने सीरम लसीसाठी केली 6.6 कोटींची डील, 200 रुपयांना मिळणार एक डोस

आधी मोफत लसीची घोषणा आता केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची पलटी

(India is third country to record one lakh fifty thousand deaths due to corona)