फ्लॅटमध्ये सुरु होता देह व्यापार, पोलिसांच्या धाडीत २१ वर्षांची तरुणी आणि तिघे जण सापडले, एक जण पसार
लातूर जिल्ह्यातील एका भागात एका फ्लॅटवर धाड टाकून पोलिसांनी देहविक्रीच्या एका मोठ्या रॅकेटचा भंडाफोड केला आहे. या प्रकरणात दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.

लातूर जिल्ह्यात पोलिसांनी देहविक्रीच्या एका मोठ्या रॅकेटचा भंडाफोड केला आहे. या प्रकरणात दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. तर २१ वर्षांच्या एका तरुणीची सुटका करण्यात आली आहे. या तरुणीला या देहव्यापाऱ्यात जबरदस्तीने ढकलण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. या छाप्याच्या वेळी एक जण घटना स्थळावरून पसार होण्यास यशस्वी झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
लातूरच्या मौलीनगर भागात ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांना एका फ्लॅटमध्ये देह व्यापार सुरु असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकण्याच्या ऐवजी पोलिसांनी या प्रकरणात गुपचूप कारवाई करण्याचा निर्णय घेतला. या फ्लॅटमध्ये शुक्रवारी एका व्यक्तीला ग्राहक म्हणून पाठवण्यात आले. तेथे खरोखरच देहव्यापार सुरु आहे का याची माहिती घेण्यासाठी अशा प्रकारे नकली कस्टमर पाठवण्यात आला होता. जेव्हा खबर पक्की असल्याचे कळले तेव्हा पोलिसांनी या फ्लॅटवरच धाड टाकली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावरुन दोन लोकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात जावेद युसूफ सैयद आणि जयश्री राम तरोटे यांना अटक झाली आहे. धाडीत त्यांचा अन्य एक साथीदार घटना स्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी झाला. छापेमारीत पोलिसांनी २१ वर्षांच्या एका तरुणीची तेथून सुटका केली आहे. ही तरुणी नागपूर येथील राहणारी असून चौकशी तिने आपल्या जबरदस्ती या शरीर विक्रीच्या धंद्यात ढकलण्यात आल्याचे म्हटले आहे.
तरुणीने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशांची वाटणी दोन आरोपी आणि अन्य लोकांमध्ये व्हायची. पोलिस आता या गोष्टीचा तपास करत आहे की या रॅकेटमध्ये आणखी कोणा-कोणाचा सहभाग आहे. यांचे नेटवर्क कोठपर्यंत पसरलेले आहे. या प्रकरणात लातूरच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनैतिक देह व्यापार निवारण अधिनियम अंतर्गत कारवाई केली आहे. सध्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पळून गेलेल्या तिसऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.