Pune News : पुण्यात स्पाच्या नावाखाली खुलेआम वेश्याव्यवसाय, सहा महिलांची झाली सुटका

पुण्यात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे आढळल्याने पोलिसांच्या पथकाने धाड टाकून शरीरविक्रय करण्याचे मोठे रॅकेट उद्धवस्थ केले आहे. दोन ठिकाणाहून एकून सहा महिलांची सुटका करण्यात आली आहे.

Pune News : पुण्यात स्पाच्या नावाखाली खुलेआम वेश्याव्यवसाय, सहा महिलांची झाली सुटका
file photo
| Updated on: Feb 03, 2026 | 9:57 PM

पुण्यात अनैतिक मानव तस्करी विरोधी विभागाने एका स्पा आणि लॉजवर धाड टाकून सहा महिलांची सुटका केली आहे. विशालनगरातील इंटर्नल फॅमिली स्पामधून ४ आणि निगडी येथील ईगल स्पा येथून २ महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर कृष्णा आणि योगीराज लॉज येथून प्रत्येक एका महिलेची सुटका झाली आहे. वाकड पोलिस ठाण्यात या प्रकरणात पीटा नियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. गेल्या एका महिन्यात तीन स्पा सेंटरवर बंदी घातली असून साल २०२५ मध्य २५ स्पावर कारवाई करुन ४५ आरोपींना अटक करण्यात आली तर ६३ महिलांची सुटका करण्यात आली आहे.

पुणे येथे देह व्यापार करणाऱ्या स्पा सेंटर आणि लॉजवर अनैतिक मानव तस्कर विरोधी विभागाने कारवाई करत सहा महिलांची सुटका केली आहे यात विशालनगर आणि निगडी येथून या सहा महिलांची मुक्तता करण्यात आली आहे. आळंदी येथील योगीराज लॉज आणि कृष्णा लॉजवरुन प्रत्येक एका महिलेची मुक्तता झाली आहे.

स्पा संचालक महिलेवर गुन्हा दाखल

वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत इंटर्नल फॅमिली स्पावर रात्री १० वाजता पोलिसांच्या टीमने छापा टाकला. यावेळी चार महिलांना मुक्त करण्यात आली आहे. या प्रकरणात स्पा संचालक महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर स्पाचा मॅनेजर अब्दुल मोहम्मद हुसैन कलाम याला अटक झाली आहे. वाकड पोलिस ठाण्यात या प्रकरणात पीटा अधिनियमानुसार गुन्हे दाखल झाले आहेत.

निगडी येथील ईगल स्पा येथेही पोलिसांनी कारवाई केली आहे. येथून दोन महिलांची सुटका केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलांना पैशाचे आमीष दाखवून जबरदस्ती देहव्यापार करवून घेतला आहे. या शिवाय कृष्णा लॉज आणि आळंदी स्थित योगीराज लॉजवर छापा टाकून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.