
साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदने चांगलाच चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक जुना व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये वर्दीत नसताना देखील त्याने काही गाड्यांची चेकींग करुन चालकाला त्रास दिल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्या त्रासाला कंटाळून महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचे समोर आले. याबाबत महिलेने हातावर नोट लिहिल्याचे समोर आले. महिलेच्या आत्महत्येबाबत कळताच गोपाल बदने हा फरार होता. दोन दिवस गायब राहिल्यानंतर बदने फलटण पोलीस ठाण्यात शरण आले. दरम्यान, त्याने त्याचा फोन लपवून ठेवला आणि नंतर मगच सरेंडर केले. आता पीएसआय गोपाल बदनेचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
वाचा: अनाया बांगरचा मोठा निर्णय, शस्त्रक्रियेच्या 3 महिन्यांनंतर पुन्हा जुन्या गोष्टींकडे वळली
काय आहे व्हिडीओ?
कुठेही गाड्या अडवण्याचा अधिकार तुला कोणी दिला? तू पोलीस आहेस ना? माझी गाडी चेक कर. लवकर ये आणि गाडी चेक कर. माझ्या गाडीत काय आहे ते दाखव आधी. तू फोन कुणाला करु नकोस आधी गाडी चेक कर. मी व्हिडीओ करत आहे. मी कोणालाही फोन केलेला नाही. तू मला चार माणसांमध्ये अडवले आहे. मी काही केलं का? माझी गाडी व्यवस्थित होती असे एक व्यक्ती व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
वर्दीवर नसलेला हा बदने रस्त्यावर गाड्या अडवून चालकांची विचारपूस करत असल्याचे या व्हिडीओत स्पष्ट दिसतंय. एका वाहनचालकाने त्यावेळी त्याचा मोबाईल काढून या घटनेचं चित्रीकरण केलं आणि तोच व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.