पुण्यातील भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

पुण्यातील भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झालं आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

पुण्यातील भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन
| Updated on: Dec 22, 2022 | 4:25 PM

पुणे : पुण्यातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक ( Mukta Tilak ) यांचे निधन झाले आहे. गेल्या दीड महिन्यापासून पुण्यातीलखाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मुक्ता टिळक यांनी पुण्याचे महापौर पदही भूषवले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे. आमदार मुक्ता टिळक या कर्करोगाशी झुंज देत होते.

विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आजारी असताना देखील त्यांनी मतदानासाठी हजेरी लावली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्यासह सर्व भाजप नेत्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले होते. या निवडणुकीत एक-एक मताला विशेष महत्त्व आलं होतं. त्यामुळे मुक्ता टिळक यांनी आजारी असताना देखील आपला हक्क बजावला होता.

मुक्ता टिळक या 2017 ते 2019 या काळात पुण्याचे महापौरपद भूषवले होते. मुक्ता टिळक या बाळ गंगाधर टिळक यांचे नातू जयंतराव टिळक यांच्या सूनबाई आहेत.