हिवाळ्यात कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारायचे? आहारात या पदार्थांचा करा समावेश
हिवाळ्यातील हे सुपरफूड आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. याच्या सेवनाने पोटातील फॅट आणि कोलेस्ट्रॉल कमी होते. चला तर मग हिवाळ्यात आहारामध्ये कोणते सुपरफूडचे सेवन करावे त्याबद्दल जाणून घेऊयात.

हिवाळा हा अनेक प्रकारे खास मानला जातो. आल्हाददायक वातावरण असल्याने अनेकांना हा ऋतू खूप आवडतो. या ऋतूत अनेकजण बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. फिरण्यासोबतच या दिवसात खाण्यापिण्याचे पर्यायही लक्षणीयरीत्या वाढतात. हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी आपल्याला अनेकदा आपल्या आहारात बदल करावे लागतात. म्हणूनच आरोग्य तज्ञ आपल्याला आहारात फळे, भाज्या आणि सुकामेवा समाविष्ट करण्याचा सल्ला देतात.
हिवाळ्यात खाण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानल्या जाणाऱ्या या आरोग्यदायी पदार्थांपैकी एक म्हणजे अंजीर. त्याचे फायदे इतके असंख्य आहेत की अंजीरला हिवाळ्यातील सुपरफूड म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तथापि असे बरेच लोक आहेत ज्यांना हिवाळ्यात अंजीर खाल्ल्याने कोणते फायद्ये आरोग्यासाठी होतात ते माहिती नाही. म्हणून या लेखात आपण हिवाळ्यात अंजीर खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध
अंजीर हे पॉलीफेनॉल, फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीनोइड्स आणि व्हिटॅमिन ई चे समृद्ध स्रोत आहेत. अंजीरच्या सेवनाने आपल्या शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्स काढून टाकतात आणि पेशी आणि ऊतींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. तसेच आपल्या पोटातील जळजळ कमी करतात, ज्यामुळे हिवाळ्यात अंजीर खाणे हे हृदयरोग, मधुमेह आणि संधिवात असलेल्या लोकांसाठी उत्तम आहे.
हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
अंजीरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जे हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की अंजीर मध्ये इतर फळांपेक्षा 3.2 पट जास्त कॅल्शियम असते, जे हाडांच्या घनतेसाठी चांगले असते आणि ऑस्टियोपोरोसिस प्रतिबंधित करते.
रक्तातील साखर नियंत्रित करा
अंजीर हे फायबर समृद्ध असल्याने रक्तप्रवाहात साखरेचे शोषण कमी करते, ज्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत अचानक वाढ होण्यास प्रतिबंध होतो. म्हणूनच मधुमेह आणि प्री-डायबिटीज असलेले लोकं सुरक्षितपणे कमी प्रमाणात अंजीर खाऊ शकतात. अंजीरमधील अँटीऑक्सिडंट्स पेशींना इन्सुलिनसाठी अधिक संवेदनशील बनवतात, ज्यामुळे ग्लुकोजचा अधिक कार्यक्षम वापर होतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
