पुण्यात काँग्रेसला गळती, संग्राम थोपटे पाठोपाठ आणखी एका बड्या नेत्याचा राजीनामा

Pune Congress: काँग्रेसचे आक्रमक युवा नेते म्हणून रोहन सुरवसे पाटील यांची ओळख आहे. पुणे शहरात काँग्रेसच्या विविध आंदोलनात ते सक्रिय सहभाग असत. खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल विधान केले होते. ते आता काँग्रेसमधून बाहेर पडले आहे.

पुण्यात काँग्रेसला गळती, संग्राम थोपटे पाठोपाठ आणखी एका बड्या नेत्याचा राजीनामा
congress
| Updated on: Apr 20, 2025 | 7:25 AM

Pune Congress: महाराष्ट्रात काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचे चिन्ह नाही. त्यातच पुणे जिल्ह्यात काँग्रेसला एका पाठोपाठ एक झटके बसत आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर भोरचे माजी आमदार व काँग्रेसचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जाणारे संग्राम थोपटे हे देखील भाजपच्या वाटेवर आहेत. आता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व सरचिटणीस पदाचा राजीनामा पक्षाकडे सोपवला आहे. ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दाखल होणार आहे.

कोण आहे रोहन सुरवसे पाटील?

काँग्रेसचे आक्रमक युवा नेते म्हणून रोहन सुरवसे पाटील यांची ओळख आहे. पुणे शहरात काँग्रेसच्या विविध आंदोलनात ते सक्रिय सहभाग असत. खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल विधान केले होते. त्याला समर्थन देत रोहन पाटील यांनी सारसबाग येथील सावरकर पुतळ्याजवळ “माफीवीर” असा बॅनर लावला होता. यानंतर त्यांना अटक झाली होती.

संग्राम थोपटे मेळावा घेणार

काँग्रेस नेत्या सोनिया गांधीचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव संग्राम थोपटे यांनीही काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते रविवारी मेळावा घेणार आहे. या मेळाव्यातून भाजपमध्ये जाण्याबाबत भूमिका मांडणार आहे. थोपटे परिवार चार दशकांपेक्षा जास्त काळ काँग्रेसमध्ये होता. अनंतराव थोपटे सहा वेळा तर संग्राम थोपटे तीन वेळा आमदार झाले होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या विरोधात संग्राम थोपटे निवडणूक रिंगणात उभे होते. त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

दरम्यान, संग्राम थोपटे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, माझे कुठल्याही पक्षात जाण्याबाबत निर्णय झाला नाही. 20 एप्रिल 2025 रोजी मी भोर येथे मेळावा घेणार आहे. त्या मेळाव्यात मी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून पुढील राजकीय वाटचालीबाबत निर्णय घेणार आहे. त्यानंतर आगामी भूमिका मांडणार आहे.