AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Ganesh Kale Case : दोन गोष्टी सापडल्या अन्… गणेश काळे हत्याकांडात सर्वात मोठी अपडेट, आंदेकर टोळीचा…

पुण्यात गणेश काळे खून प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. आंदेकर टोळीच्या सदस्यांनी गणेश काळे यांना भर रस्त्यात गोळ्या घातल्या आहेत. गोळ्या घातल्यानंतर काळे यांच्यावर कोयत्याने वार केले आहेत.

Pune Ganesh Kale Case : दोन गोष्टी सापडल्या अन्... गणेश काळे हत्याकांडात सर्वात मोठी अपडेट, आंदेकर टोळीचा...
pune crime news and ganesh kale murder
| Updated on: Nov 01, 2025 | 7:06 PM
Share

Pune Ganesh Kale Murder Case : गेल्या काही महिन्यांत पुण्यात हत्येच्या अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. आयुष कोमकर हत्या प्रकरणाने तर संपूर्ण महाराष्ट्रातच खळबळ उडाली होती. या तरुण मुलाला पार्किंगमध्ये गोळ्या घालण्यात आल्या होत्या. आता गणेश काळे या रिक्षाचालकाची भर पावसात धाडधाड गोळ्या घालून रस्त्यावरच हत्या करण्यात आली आहे. आंदेकर टोळीने हे हत्याकांड घडवून आणल्याचे बोलले जात आहे. गोळ्या घालून नंतर गणेश काळेवर कोयत्यानेही वार करण्यात आले आहेत. दरम्यान, आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आल आहे. पोलिसांनी तातडीने तपास करत या प्रकरणात मोठे यश मिळवले आहे.

रस्त्यावरच गणेश काळेची हत्या

प्राप्त माहितीनुसार गणेश काळे यांच्या खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला बोलवून ज्या ठिकाणी हत्या झाली, त्या ठिकाणचे पुरावे जमा केले. त्यानंतर लगेच पोलिसांनी आपला तपास सुरू केला. या प्रकरणात एकूण तीन ते चा जणांनी रस्त्यावरच गणेश काळे यांना गाठत रिक्षातच गोळ्या घातल्या आहेत. गोळ्या घालून लगेच हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले होते. आता याच संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी सीसीटीव्ही ताब्यात घेतले, तपास सुरू

पोलिसांनी गणेश काळे हत्या प्रकरणात सहा संशयित आरोपींना पकडले आहे. आज (1 नोव्हेंबर) दुपारी गणेश काळे यांचा गोळ्या घालून खून झाला. त्यानंतर पुढच्याच काही तासांत पोलिसांनी वेगाने तपास करत या प्रकरणात एकूण सहा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी हत्येची घटना घडली त्या परिसरातील पेट्रोल पंपावर असलेले सीसीटीव्हीदेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. आता आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींची ओळख पटवण्याचे काम चालू आहे.

भविष्यात कोणती माहिती समोर येणार?

दरम्यान, गणेश काळे हे समीर काळे यांचे बंधू आहेत. समीर काळे हा नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणात आरोपी आहे. वनराज आंदेकर यांचा खून करण्यासाठी शस्त्र पुरवल्याचा समीर काळे याच्यावर आरोप आहे. आता या प्रकरणात आणखी कोणकोणती माहिती समोर येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान