मोठी बातमी! आज कदाचित शेवटची सभा…; पुणे MPSC आंदोलनाबाबत रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
15 आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केल्यानंतर बोलताना आमदार रोहित पवारांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे, ते म्हणाले की, कदाचित आजची शेवटची सभा असू शकते...

पुण्यातील MPSC विद्यार्थी आंदोलनात रोज मोठ्या घडामोडी घडत आहेत. हे आंदोलन २ ऑक्टोबर रोजी सुरु आहे. गांधी जयंतीला सुरु झालेल्या या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पत्रकार भवन, एस. एम. जोशी पूल आणि पुणे शहरातील विविध ठिकाणी सत्याग्रह व आंदोलन सुरू आहे. आता आज याप्रकरणी १५ आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर आता आमदार रोहित पवार हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, विद्यार्थ्यावर FiR दाखल झाला आहे. हातात दगड होते , रॉकेट होते असे कलम टाकण्यात आले आहेत. आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. आज कदाचित शेवटची सभा असू शकते. चांगली गोष्ट आहे ना. समजून घ्या जे समजायचं आहे ते, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते सगळे गुन्हे जामीनपात्र आहेत. पण आज नाही तर उद्या विषय संपणार आहे. ते आज किवा उद्या कोणाला तरी पाठवतील. त्याचं सगळं क्रेडिट उपोषणकर्त्यांना जातं. आम्ही इथे पाठिंबा द्यायला हवा होता. आज कदाचित शेवटची सभा असू शकते, चांगली गोष्ट आहे ना. समजून घ्या जे समजायचं आहे ते, असं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
पुण्यातील MPSC विद्यार्थी आंदोलनाला आज राकेश टिकैत, कन्नन गोपीनाथन साहेब (माजी IAS अधिकारी), अमोल मिटकरी, रमाकांत दादा कोंडुस्कर, रिया अहीर हे मान्यवर भेट देणार असल्याची माहिती रोहित पवारांनी दिली. दरम्यान, या आंदोलनातून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवारव यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर वेळेवर पदभरती करण्यात यावी आणि एमपीएससी आयोगाची सर्व प्रक्रिया पारदर्शक करावी अशा मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
पुढे त्यांनी सांगितलं की, माझं नाव एफआयआरमध्ये नाव असत तर. मी फ्रेम करून ठेवला असतं. हा FIR विद्यार्थ्यांसाठी झाले. मला अभिमान असला असता, माझ्यावर अन्याय करू नका. माझा पण नाव त्यामध्ये घ्या. जास्तीत जास्त पासपोर्टला अडचण येईल, असा टोला त्यांनी पोलिसांना लगावला.
