AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यानंद बापट यांच्यावर कोणी हल्ला केला? पुणे पोलिसांची पहिली प्रतिक्रिया समोर

पुण्यात विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. डीजेला विरोध केल्याने एका तरुणाने बापट यांना मारहाण केली.

विद्यानंद बापट यांच्यावर कोणी हल्ला केला? पुणे पोलिसांची पहिली प्रतिक्रिया समोर
vidyanand bapat attack in pune Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 03, 2026 | 1:43 PM
Share

पुण्यात डीजे बंदीच्या मागणीवरून दोन गट पडले आहेत. गणेश मंडळातील तरुणांकडून डीजे सुरू राहावा, अशी मागणी केली जात आहे. तर विद्यानंद बापट यांच्यासहित इतर पुणेकरांकडून डीजेला विरोध केला जात आहे. यावरून पुण्यात चांगलाच वाद पेटला आहे. अशातच डीजेच्या विरोधात आवाज उचलणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. बापट हे टीव्ही9 शी बोलत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. या प्रकरणावर पुणे पोलिसांची प्रतिक्रिया समोर आली आहे .

विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यातील एका तरुणाने हल्ला केला. मला आधी त्याच्या दोन वाजवू द्या, पुणेकरांबद्दल तुला कोणी…असं म्हणत बापट यांच्यावर हल्ला केला. बापट यांच्यावर हल्ला झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनेवर पुणे पोलिसांनी प्रतिक्रिया देत कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले. पुणे पोलीस म्हणाले, ‘आरोपीने मारहाण का केली, याची माहिती घेणार. व्हिडिओमध्ये एक तरुण मारहाण करताना दिसत आहे. या घटनेची माहिती घेऊन कारवाई केली जाईल’. बापट यांना मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी सुरक्षितरित्या विद्यानंद बापट यांना वाहनातून पोलीस स्टेशनला नेले. तर विद्यानंद बापट यांना मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव संतोष चव्हाण असल्याची माहिती हाती आली आहे.  संतोष चव्हाण हा फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे. संतोष हा प्रियदर्शनी गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष आहे.

तत्पूर्वी, विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. बापट यांच्या हल्ल्याचा सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून निषेध नोंदवला जात आहे. या हल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी बापट यांच्यासाठी धावून आल्या आहेत. पोलीस स्टेशनला पोहोचून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यानंद बापट यांच्या भूमिकेचं समर्थन केलं. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी म्हणाल्या, विद्यानंद बापट हे सातत्याने एक मुद्दा मांडत आहे. तो मुद्दा अनेकांना पटणारा नाही. परंतु कायदा हातात घेणे चुकीचे आहे. त्यांचा मारहाणीचा निषेध करतो. मारहाणीनंतर सुप्रिया सुळे यांनी बापट यांच्याशी संवाद साधलाय. त्यांची माहिती घेत आहेत. त्यांना सर्वपरीने मदत करू. खरंतर ही भाजपची गुंडशाही सुरू आहे. त्यांचे शहाराध्यक्ष त्यांना कुत्रही विचारत नसल्याचे बोलतात’.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,