क्रूझरचा टायर फुटला, गाडी डिव्हायडर तोडून थेट… अंगावर काटा आणणारे फोटो समोर

पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी देवकर एमआयडीसी जवळ टायर फुटल्याने भीषण अपघात झाला आहे. यावेळी क्रूझर आणि ट्रकच्या धडकेत ३ कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे.

| Updated on: Mar 17, 2026 | 1:08 PM
1 / 8
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर एमआयडीसी परिसरात आज सकाळी एक भीषण अपघात झाला. या भीषण रस्ते अपघातात ३ कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे.

2 / 8
वेगात असलेल्या क्रूझर गाडीचा पुढचा टायर अचानक फुटल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ही गाडी थेट समोरून येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. या अपघात इतका भीषण होता की क्रूझर गाडीचा चक्काचूर झाला आहे.

3 / 8
मिळालेल्या माहितीनुसार, एक क्रूझर गाडी कामगारांना घेऊन पुणे-सोलापूर महामार्गावरून जात होती. लोणी देवकर एमआयडीसी हद्दीत ही गाडी आली असता, अचानक गाडीच्या पुढच्या टायरचा स्फोट झाला. टायर फुटल्यामुळे चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले.

4 / 8
नियंत्रण सुटलेली ही गाडी वेगात असताना डिव्हायडर ओलांडून विरुद्ध बाजूच्या लेनमध्ये घुसली. दुर्दैवाने त्याच वेळी समोरून एक अवजड ट्रक येत होता. या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरात धडक झाली. या धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक आणि एमआयडीसीमधील कामगार तातडीने मदतीसाठी धावले.

5 / 8
ही क्रूझर गाडी ट्रकला धडकल्यानंतर पूर्णपणे चिरडली गेली होती.  यामध्ये प्रवास करणाऱ्या ३ कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तसेच या गाडीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांना मोठे प्रयत्न करावे लागले. जखमींना तातडीने नजीकच्या खाजगी व सरकारी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

6 / 8
या अपघाताची माहिती मिळताच डाळज येथील महामार्ग पोलीस आणि इंदापूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. या अपघातामुळे महामार्गावरील सोलापूरकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

7 / 8
मात्र पोलिसांनी युद्धपातळीवर काम करून ती सुरळीत केली. आता मृतदेहांचे शवविच्छेदन इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येत असून, मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

8 / 8
महामार्गावर वाहनांचा वाढलेला वेग आणि टायर फुटण्यासारख्या तांत्रिक बिघाडामुळे निष्पाप लोकांचे जीव जात असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच यामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. तसेच वाहनांची नियमित तपासणी आणि वेगावर नियंत्रण असणे किती गरजेचे आहे, हे देखील या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

Follow Us