पुण्यातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ‘बॉम्बस्फोट’ मतदार, यादीतल्या त्या नावाची चर्चा, नेमका घोळ काय?

मतदाराचे आडनाव बॉम्बस्फोट असल्याचे समोर आल्यानंतर साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलंय. इंग्रजी यादीत नाव योग्य असून केवळ मराठी नोंदीत ही गंभीर चूक झाली, असं प्रशासनाने सांगितलंय.

पुण्यातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बॉम्बस्फोट मतदार, यादीतल्या त्या नावाची चर्चा, नेमका घोळ काय?
pune election voter list
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 01, 2026 | 10:29 PM

Pune Election : सध्या निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले जात आहेत. एसआयर प्रणाली, मतदार याद्या तसेच याआधी झालेल्या विधानसभा निवडणुका यात निवडणूक आयोगाने सरकार धार्जीणी भूमिका घेतली. मतदार याद्यांत मोठा घोळ आहे, असा दावा विरोधकांकडून केला जातोय. सध्या राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी निवडणुका चालू आहेत. असे असतानाच पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत वाई येथील एका मतदाराचे आडनाव थेट बॉम्बस्फोट असल्याचे समोर आले. हा प्रकार समोर आल्यानंतर विरोधकांनी निडणूक आयोगावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले.

बॉम्बस्फोट नावाचा नेमका घोळ काय?

समोर आलेल्या माहितीनुसार ‘प्रशांत बोंबले’ नावाच्या मतदाराचे नावचक्क ‘प्रशांत दादा साहेबाची बॉम्बस्फोट’ असे प्रसिद्ध झाले होते. या नावानंतर आमदार रोहित पवार यांनी देशाचे मुख्य निवडमूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना घेरलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार त्यांनी तर वेगळाच घोळ घातला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी मतदारयादीत वडिलांचा बॉम्बस्फोट आणि बॉम्ब अशी नावे आहेत. हे हास्यास्पद आहे. पण तेवढेच दुर्दैवीदेखील आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच यासाठी जी व्यक्ती जबाबदार त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. जोपर्यंत सगळे घोळ संपत नाहीत तोपर्यंत निवडणूका घेऊ नयेत, अशी मागणीही त्यांनी केली.

Loading...

जिल्हाधिकाऱ्यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलं?

मतदाराचे आडनाव बॉम्बस्फोट असल्याचे समोर आल्यानंतर साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलंय. इंग्रजी यादीत नाव योग्य असून केवळ मराठी नोंदीत ही गंभीर चूक झाली. संबंधित नावात तातडीने दुरुस्ती करण्यात आली असून 6 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. तसेच अशा अक्षम्य चुकीसाठी जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, आता हे बॉम्बस्फोट नाव बदलण्यात आलेले असले तरीही झालेल्या या चुकीची सगळीकडे चर्चा होत आहे. सामान्य मतदार याला विनोद म्हणून घेतायत. तर विरोधकांनी मात्र निवडणूक आयोगाला लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us