100 रुपयांची किट 200-300 रुपयांत काळ्याबाजारात?, अजित पवार नेमकं काय म्हणाले

| Updated on: Oct 22, 2022 | 2:31 PM

100 रुपयांत शिधा चांद्यापासून बांद्यापर्यंत अद्याप पोहचला नाही.

100 रुपयांची किट 200-300 रुपयांत काळ्याबाजारात?, अजित पवार नेमकं काय म्हणाले
अजित पवार नेमकं काय म्हणाले
Follow us on

बारामती : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, मला काही पत्रकारांनी सांगितलं, की दादा 100 रुपयांची किट कुठं 200 रुपयांना, तर कुठं तीनशे रुपयांना काळ्याबाजारात विकली जात आहे. हे सर्व चुकीचं असल्याचं अजित पवार यांनी म्हंटलंय. आनंदाचा शिधा काही ठिकाणी पोहचला. पण, काही ठिकाणी अद्याप पोहचला नाही. काही ठिकाणी चारपैकी तीन, तर काही ठिकाणी चारपैकी दोनच वस्तू दिल्या गेल्याची माहिती समोर येते. योजना चांगली आहे. पण, नियोजनाच्या अभावामुळं हे सारे होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

अजित पवार म्हणाले, दिवाळीचा सण सुरू झाला आहे.100 रुपयांत शिधा चांद्यापासून बांद्यापर्यंत अद्याप पोहचला नाही. मध्यमवर्ग म्हणतो, आम्हाला का देत नाही. गरीब आणि मध्यमवर्गीय यांची मागणी आहे. याबाबत महिलांनी सुतोवाचं केला. निटपणे चांगलाही कार्यक्रम राबवित असताना व्यवस्थितपणे नियोजन करावं लागतो. अन्यथा भोंगळ कारभार बाहेर येतो.

चारमधील तीन वस्तू आहेत. चारपैकी दोनच वस्तू आहेत, अशी परिस्थिती काही ठिकाणी आहे. दिवाळी झाल्यानंतर शंभर रुपयांत शिधा मिळून उपयोग काय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री सांगतात, पोहचला पोहचला. पण, अद्याप काही ठिकाणी पोहचला नाही. शंभर रुपयांची किट काळ्याबाजारात जात असल्याचं मला काही पत्रकारांनी सांगितलं. कुणी दोनशे रुपयांना विकतं तर कुणी तीनशे रुपयांना विकतंय. हे पण चुकीचं आहे.

काही भागात अतिवृष्टी झाली. तातडीनं मदत झाली तर त्यांचा उपयोग होईल. 50 हजार रुपयांची मदत आता सुरू केली. पुढं दोन लाखांच्या वरचा निर्णय घेणार, असं सांगितलं होतं. जेकाही झालं त्याबद्दल कौतुक आहे. त्याबद्दल धन्यवाद. पण, जे निट होत नाही, हे योग्य नाही.

दिवाळीत आम्ही पवार कुटुंबीय सहकारी, नातेवाईक यांना भेटतो. चार दिवस आनंदात एकमेकांच्या सहवासात घालवतो.
राज ठाकरे, एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं. दिवाळीच्या वेळी भेटलं पाहिजे. बोललं पाहिजे. तुम्हाला बातम्या मिळत नाही. म्हणून कशाचीही बातमी करता का, असंही त्यांनी म्हंटलं.

अंधेरी येथील विधानसभा पोटनिवडणुकीत लटके यांच्या उमेदवारीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिला. कोणी कोणत्या मतदारसंघात काय सांगावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एमसीएमध्ये आशिष शेलार यांची निवड झाली. यासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, आम्ही खेळात राजकारण आणत नाही. यापूर्वी अरुण जेटली, फारुख अब्दुल्ला, लालू यादव हेही प्रतिनिधीत्व करत होते.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मिळाला नाही. याबाबत ते म्हणाले, मला वाटलं जामीन मिळेल. पण, न्यायव्यवस्थेच्या मधात काही बोलणार नाही.