AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झिका व्हायरस बाधित पुरंदरच्या बेलसर गावात आज केंद्राचं पथक येणार, पाहणी करुन अहवाल देणार

पुरंदरला आढळलेल्या झिका व्हायरस बाधित बेलसर या गावाची तपासणी करण्यासाठी आज केंद्रातून पथक येणार आहे.

झिका व्हायरस बाधित पुरंदरच्या बेलसर गावात आज केंद्राचं पथक येणार, पाहणी करुन अहवाल देणार
प्रतिकात्मक फोटो
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Aug 03, 2021 | 9:34 AM
Share

पुणेमहाराष्ट्रात झिकाचा विषाणूचा पहिला रुग्ण 30 जुलै रोजी पुणे जिल्ह्यात आढळला आहे. पुरंदर तालूक्यातील बेलसर या ठिकाणी झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. पुरंदरला आढळलेल्या झिका व्हायरस बाधित बेलसर या गावाची तपासणी करण्यासाठी आज केंद्रातून पथक येणार आहे.

केंद्राचं पथक पुरंदरच्या बेलसरमध्ये

केंद्राचं तीन जणांचं पथक बेलसर गावाची पाहणी करणार  आहे. दिल्लीतून सर्वेक्षण करण्यासाठी कुटुंब कल्याण मंत्रालयानं हे पथकं पाठवलं आहे. दिल्लीच्या लेडी हार्डींग वैद्यकीय महाविद्यालय स्त्रीरोगतज्ज्ञ, आणि राष्ट्रीय हिवताप संशोधन केंद्रातील किटकतज्ज्ञांचा या पथकात समावेश आहे. बेलसर गावाची पाहणी करुन हे पथक केंद्राला अहवाल देणार आहे.

बेलसरमध्ये झिकाचा पहिला रुग्ण, जेजुरीकरांची चिंता वाढली

बेलसरमध्ये झिकाचा रुग्ण आढळल्यानं जेजुरीकरांची चिंता वाढली आहे. त्यामुळे जेजुरी व परिसरातील गावांमध्ये सर्वेक्षण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जेजुरी परिसरात डेंग्यु, चिकन गुनिया आजारानं घातलं थैमान घातलं आहे.

जेजुरीतील ग्रामीण रुग्णालय केवळ कोरोना उपचार आणि लसीकरणापुरतेच उरले आहेत की काय, अशी विचारणा आता नागरिक करत आहेत. ग्रामीण रुग्णालयात इतर आजारांवर उपचार बंद असल्याने नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत.

झिकाचा पहिला रुग्ण पुरंदरच्या बेलसरमध्ये

राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे यांनी 30 जुलै रोजी महाराष्ट्रात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळ्याची माहिती दिली. झिका विषाणूचा संसर्ग झालेल्या 50 वर्षीय महिला रुग्णाची हिस्ट्री तपासणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. झिकाचा संसर्ग झालेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानं दिली आहे.

झिका विषाणुची लक्षणं कोणती?

झिकाचे पहिले लक्षण म्हणजे ताप येणे, अंगदुखणे, अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे तसेच या व्हायरल दरम्यान प्रचंड डोकेदुखी होते, डोळे लाल होणे, अशक्तपणा आणि थकवा हे देखील या व्हायरलचे प्रमुख लक्षण आहे. मात्र, सुरूवातीला आलेल्या तापावरून झिका व्हायरल कळणे थोडे कठीण आहे.

झिकापासून वाचण्यासाठी काय करावं

झिका व्हायरसवर असे काही विशिष्ट औषध नाहीये. मात्र, झिका व्हायरसच्या दरम्यान आपण जास्तीत-जास्त पाणी पिले पाहिजे. झिका व्हायरलमध्ये साधेदुखीचा त्रास अधिक होतो. यामुळे आपण जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. झिका व्हायरसमध्ये जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

झिका व्हायरसवर लस किंवा उपचार नाही

सध्या झिका व्हायरसला कोणतीही लस किंवा उपचार नाही. झिका व्हायरसमध्ये आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम होतो. गर्भवती महिलांमध्ये हा संसर्ग विकसनशील गर्भास गंभीरपणे हानी पोहोचवू शकतो आणि जन्मजात विसंगती होऊ शकतात. हा झिका व्हायरस डासांमुळे होतो.

(A team from the Center will visit Belsar village of Purandar, which is infected with Zika virus)

हे ही वाचा :

महाराष्ट्रावर नवं संकट, राज्यात झिका विषाणूचा पहिला रुग्ण, आरोग्य यंत्रणा ॲलर्ट

झिका विषाणूचा धोका वाढला, केरळात एका शहरात 14 रुग्ण, तामिळनाडू सरकार अलर्ट, सीमेवर बंदोबस्त वाढवला

कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका वाढला, पाहा लक्षणं कोणती आणि लागण कशी होते?

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...