AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झिका विषाणूचा धोका वाढला, केरळात एका शहरात 14 रुग्ण, तामिळनाडू सरकार अलर्ट, सीमेवर बंदोबस्त वाढवला

केरळमध्ये शुक्रवारी झिका विषाणू रुग्णांची संख्या 14 वर पोहोचली आहे. 14 पैकी 13 जण आरोग्य कर्मचारी आहेत. राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून 13 जणांना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आल्यानंतर केरळमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

झिका विषाणूचा धोका वाढला, केरळात एका शहरात 14 रुग्ण, तामिळनाडू सरकार अलर्ट, सीमेवर बंदोबस्त वाढवला
झिकाच्या भीतीमुळे बेलसर ग्रामपंचायतने वाटले निरोध; चार महिने गर्भधारणा टाळण्याचा सल्ला
| Edited By: | Updated on: Jul 10, 2021 | 12:32 PM
Share

नवी दिल्ली: केरळमध्ये शुक्रवारी झिका विषाणू रुग्णांची संख्या 14 वर पोहोचली आहे. 14 पैकी 13 जण आरोग्य कर्मचारी आहेत. राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून 13 जणांना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आल्यानंतर केरळमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. झिकाचे सर्व रुग्ण तिरुअनंतपुरम येथील आहेत. राज्यात गुरुवारी एका 24 वर्षीय गरोदर महिलेला संसर्ग झाल्याच समोर आलं होतं. संबंधित महिलेची 7 जुलैला प्रसुती झाली होती. महिलेसर तिच्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. (Kerala Zika Virus cases reach to 14 Tamil Nadu Government alert increased vigil at border)

झिका विषाणूची लक्षणं कोणती?

राज्य सरकारच्या माहितीनुसार राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे 19 नमुने पाठवण्यात आले होते. त्यापैकी 13 रुग्णांना झिकाचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. डेंग्यूची लक्षणं साधारणपणे डेंग्यू सारखी असतात. झिकाचे पहिले लक्षण म्हणजे ताप येणे, अंगदुखणे, अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे तसेच या व्हायरल दरम्यान प्रचंड डोकेदुखी होते, डोळे लाल होणे, अशक्तपणा आणि थकवा हे देखील या व्हायरलचे प्रमुख लक्षण आहे. मात्र, सुरूवातीला आलेल्या तापावरून झिका व्हायरल कळणे थोडे कठीण आहे.

राज्य सरकार अलर्ट

केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी राज्य सरकारनं झिका संक्रमण रोखण्यासाठी योजना तयार केली असल्याची माहिती दिली आहे. राज्यातील सरकारी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयांमध्ये चाचणी करण्याची सुविधा करण्यात येत असल्याची माहिती दिली.

केरळमध्ये झिका रुग्ण तामिळनाडू अलर्ट

केरळमध्ये झिकाचे 14 रुग्ण समोर आल्यानंतर तामिळनाडू सरकार अलर्ट झालं आहे. तामिळनाडूच्या आरोग्य विभागानंल जिल्हा आणि विशेषता केरळच्या सीमेवरील जिल्ह्यांवर चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.

झिकापासून वाचण्यासाठी काय करावं

झिका व्हायरसवर असे काही विशिष्ट औषध नाहीये. मात्र, झिका व्हायरसच्या दरम्यान आपण जास्तीत-जास्त पाणी पिले पाहिजे. झिका व्हायरलमध्ये साधेदुखीचा त्रास अधिक होतो. यामुळे आपण जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. झिका व्हायरसमध्ये जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

झिका व्हायरसवर लस किंवा उपचार नाही

सध्या झिका व्हायरसला कोणतीही लस किंवा उपचार नाही. झिका व्हायरसमध्ये आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम होतो. गर्भवती महिलांमध्ये हा संसर्ग विकसनशील गर्भास गंभीरपणे हानी पोहोचवू शकतो आणि जन्मजात विसंगती होऊ शकतात. हा झिका व्हायरस डासांमुळे होतो.

इतर बातम्या:

कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका वाढला, पाहा लक्षणं कोणती आणि लागण कशी होते?

Mumbai | मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा ! 13 जुलै रोजी पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता

(Kerala Zika Virus cases reach to 14 Tamil Nadu Government alert increased vigil at border)

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...