कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका वाढला, पाहा लक्षणं कोणती आणि लागण कशी होते?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 09, 2021 | 11:42 AM

जवळपास गेल्या दोन वर्षांपासून कोरोना व्हायरसमुळे सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाची दुसरी लाट जवळपास ओसरत आली आहे. मात्र, तिसऱ्या लाट येण्याची भिती अजूनही आहे

कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका वाढला, पाहा लक्षणं कोणती आणि लागण कशी होते?
झिकाच्या भीतीमुळे बेलसर ग्रामपंचायतने वाटले निरोध; चार महिने गर्भधारणा टाळण्याचा सल्ला
Follow us

मुंबई : जवळपास गेल्या दोन वर्षांपासून कोरोना व्हायरसमुळे सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाची दुसरी लाट जवळपास ओसरत आली आहे. मात्र, तिसरी लाट येण्याची भिती अजूनही आहे. संपूर्ण देश कोरोनासोबत दोन हात करत असतानाच आता झिका व्हायरसने देखील देशात एन्ट्री केली आहे. यामुळे अधिकच धोका वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे एका गर्भवती महिलेला या झिका व्हायरसची लागण झाली आहे. या झिका व्हायरसचे जवळपास 13 रूग्ण केरळ राज्यात आढळले आहेत. (Symptoms and remedies for zika virus)

झिका व्हायरसची लक्षणे 

झिकाचे पहिले लक्षण म्हणजे ताप येणे, अंगदुखणे, अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे तसेच या व्हायरल दरम्यान प्रचंड डोकेदुखी होते, डोळे लाल होणे, अशक्तपणा आणि थकवा हे देखील या व्हायरलचे प्रमुख लक्षण आहे. मात्र, सुरूवातीला आलेल्या तापावरून झिका व्हायरल कळणे थोडे कठीण आहे.

भरपूर पाणी प्या

झिका व्हायरसवर असे काही विशिष्ट आैषध नाहीये. मात्र, झिका व्हायरसच्या दरम्यान आपण जास्तीत-जास्त पाणी पिले पाहिजे. झिका व्हायरलमध्ये साधेदुखीचा त्रास अधिक होतो. यामुळे आपण जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. झिका व्हायरसमध्ये जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

झिका व्हायरसवर लस किंवा उपचार नाही

सध्या झिका व्हायरसला कोणतीही लस किंवा उपचार नाही. झिका व्हायरसमध्ये आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम होतो. गर्भवती महिलांमध्ये हा संसर्ग विकसनशील गर्भास गंभीरपणे हानी पोहोचवू शकतो आणि जन्मजात विसंगती होऊ शकतात. हा झिका व्हायरस डासांमुळे होतो.

गर्भवती महिलांना सर्वाधिक धोका

झिका व्हायरसचा सर्वाधिक धोका हा गर्भवती महिलांना असतो. विशेष म्हणजे याची लागण बाळाला होण्याची देखील शक्यता असते. यादरम्यान बाळाला विविध आजार होण्याची देखील शक्यता असते. झिका व्हायरचा डास नेहमी चांगल्या पाण्यात असतो.

संबंधित बातम्या : 

कोरोना लसीच्या पहिला डोस ते दुसऱ्या डोस दरम्यानची गर्भधारणा किती सुरक्षित? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प घट, कोरोनाबळी मात्र वाढले

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 9 हजारांनी वाढ, कोरोनाबळी पुन्हा नऊशेपार

(Symptoms and remedies for zika virus)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI