AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : बिबवेवाडीनंतर आता उंड्रीत बाऊन्सरकडून पालकांना धक्काबुक्की, युरो शाळा प्रशासनाची मुजोरी

बिबवेवाडी (Bibwewadi) येथील क्लाइन मेमोरियल शाळेनंतर पुण्यातील उंड्री (Undri) येथील युरो शाळेत ही पुन्हा बाऊन्सरकडून (Bouncer) पालकांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला गेला आहे. तर प्रवेशावेळी पालकांना बाऊन्सरकडून धक्काबुक्की करण्यात आली

Video : बिबवेवाडीनंतर आता उंड्रीत बाऊन्सरकडून पालकांना धक्काबुक्की, युरो शाळा प्रशासनाची मुजोरी
उंड्रीतील शाळेत पालकांना बाऊन्सरकडून धक्काबुक्कीImage Credit source: Tv9
Reporter Ashwini Satav Doke
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: Pradeep Garad | Updated on: Apr 04, 2022 | 12:31 PM
Share

पुणे : बिबवेवाडी (Bibwewadi) येथील क्लाइन मेमोरियल शाळेनंतर पुण्यातील उंड्री (Undri) येथील युरो शाळेत ही पुन्हा बाऊन्सरकडून (Bouncer) पालकांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. शालेय शुल्काबाबत ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रारी केल्या होत्या, त्या विद्यार्थ्यांना शाळेने मेलद्वारे टीसी पाठवले आहेत. शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला गेला आहे. तर प्रवेशावेळी पालकांना बाऊन्सरकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. बिबवेवाडी येथील शाळेतील बाऊन्सरकडून पालकांना झालेल्या धक्काबुक्कीचा मुद्दा विधानसभेतही चर्चिला गेला होता. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेत बाऊन्सर न ठेवण्याच्या त्यावेळी सूचना दिल्या होत्या. या प्रकारामुळे शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाला शाळेकडून केराची टोपली दाखवली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. आता शिक्षणमंत्री अशा मुजोर शाळांवर काय कारवाई करतात, ते पाहावे लागेल. या प्रकारानंतर पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बिबवेवाडीतही झाला होता प्रकार

बिबवेवाडीतील एका शाळेत बाऊन्सरने पालकाला मारहाण केलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये शाळेत निवदेन घेऊन गेलेल्या पालकाला तेथे उपस्थित असलेल्या बाऊन्सरने  मारहाण केली होती. पालकाने गैरवर्तन केल्याचा आरोप करत बाऊन्सरने ही मारहाण केली, काठीने चोप देत पालकाला पायऱ्यांवरून खाली ढकलून दिले. या घटनेचा सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मयूर गायकवाड वय (49 वर्षे) असे मारहाण झालेल्या पालकाचे नाव. या व्हडिओमध्ये महिला बाऊन्सर हातात की काठी घेऊन पीडित मयूर  गायकवाड यांना हात उचलता, असे म्हणत मारहाण करताना दिसत होते. त्याचबरोबर चला बाहेर निघा असं म्हणत धक्का देता बाहेर काढत असल्याचे सामोर आले. महिला बाऊन्सरबरोबर तिचा पुरुष सहकारीही महिलेला पालकाला हकलून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसून आले.

फीसवरून बिबवेवाडीत बाऊन्सरने केली होती धक्काबुक्की

पीडित मयुरेश गायकवाड हे बिबवेवाडी परिसरात वास्तव्यास आहेत. तेथील क्लाईन मेमोरिअल स्कूल या शाळेत त्याचा मुलगा शिक्षण घेत आहे. घटनेच्या दिवशी पीडित पालक शाळेने भरायला लावलेल्या फीच्या रक्कमेबाबत प्रिन्सिपलने विचारणा करण्यासाठी शाळेत गेले होते. त्यांच्या सोबत फी भरण्यासंदर्भात लेटर मिळालेले इतर पालक ही होते. शाळेत गेल्यानंतर पीडित पालक व इतर पालकांनी मिळवून त्यांचे लेखी म्हणणे प्रिन्सिपलकडे मांडून त्याची पोचपावती मागितली. मात्र याच वेळी शाळेच्या प्रिन्सिपल यांनी शाळेचं बाउन्सर बोलावून पीडितांसहा इतरांना धक्काबुक्की करत, ढकलून बाहेर काढण्यास सांगितले होते.

आणखी वाचा :

Pune water problem : पाण्याच्या समस्येनं आंबेगाव पठारचे नागरिक हैराण, क्षेत्रीय कार्यालयावर रासपनं काढला हंडा मोर्चा

Gulabrao Patil on Raj Thackeray: राज ठाकरे तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते, गुलाबराव पाटील यांची घणाघाती टीका

Pune child vaccination : पुण्यानं गाठला मुलांच्या लसीकरणाचा नवा टप्पा तर नाशिकची आघाडी

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...