AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune water problem : पाण्याच्या समस्येनं आंबेगाव पठारचे नागरिक हैराण, क्षेत्रीय कार्यालयावर रासपनं काढला हंडा मोर्चा

पुण्यातील धनकवडीत (Dhankawadi) राष्ट्रीय समाज पक्षाने (Rashtriya Samaj Paksha) हंडा मोर्चा (March) काढला आहे. आंदोलनावेळी रासप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पाण्याच्या मागणीसाठी क्षेत्रीय कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता.

Pune water problem : पाण्याच्या समस्येनं आंबेगाव पठारचे नागरिक हैराण, क्षेत्रीय कार्यालयावर रासपनं काढला हंडा मोर्चा
पाण्याच्या समस्येविरोधात रासपचा हंडा मोर्चाImage Credit source: Tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Apr 04, 2022 | 11:57 AM
Share

पुणे : पुण्यातील धनकवडीत (Dhankawadi) राष्ट्रीय समाज पक्षाने (Rashtriya Samaj Paksha) हंडा मोर्चा (March) काढला आहे. आंदोलनावेळी रासप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पाण्याच्या मागणीसाठी क्षेत्रीय कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा अडवत पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. सध्या उन्हाळा सुरू आहे. एकतर या उन्हामुळे आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे पाण्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. आंबेगाव पठार 15, 16 नंबरमध्ये कोणत्याही सुविधा तर नाहीतच मात्र पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. समस्या एवढी भयंकर आहे, की पाण्यासाठी अक्षरश: सुट्टीही काढावी लागते. म्हणजे सगळी कामे सोडून पाण्यासाठी फिरावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी मोर्चा काढल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.

‘निवेदने देऊन थकलो’

पाणीपट्टी आम्ही देतो तर पाणीही भेटायला पाहिजे. निवेदने देऊन आम्ही थकलो. त्यामुळे आंबेगाव पठार 15, 16 ते क्षेत्रीय कार्यालय असा धडक हंडा मोर्चा आम्ही काढत असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. रोज कोणीना कोणीतरी येते, फीत कापते पुढे काहीच होत नाही. निवेदनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

शहरात पाण्याची समस्या तीव्र

शहरात पाण्याची समस्या वाढली आहे. पुण्यातील दत्तनगर, भारतनगर, महादेव नगर आदी भागांत पाणी येत नसल्याने अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आक्रमक झाली होती. महापालिकेच्या विरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली असून आंदोलन (Agitation) करण्यात आले होते. प्रशासक विक्रम कुमारांच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली होती. लवकरात लवकर पाणीपुरवठा (Water supply) सुरळीत केला नाही तर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता.

आणखी वाचा :

Gulabrao Patil on Raj Thackeray: राज ठाकरे तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते, गुलाबराव पाटील यांची घणाघाती टीका

Pune childrens vaccination : पुण्यानं गाठला मुलांच्या लसीकरणाचा नवा टप्पा तर नाशिकची आघाडी

Video : ही रोषणाई नाही! कात्रज बोगद्याजवळच्या डोंगरावर भीषण वणवा, पीकांसह फळंही खाक

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर