AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : …तर हंडा मोर्चा काढू, पाणीपुरवठ्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; महादेवनगरात केलं आंदोलन

पुण्यातील दत्तनगर, भारतनगर, महादेव नगर आदी भागांत पाणी येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आक्रमक झाली आहे. महापालिकेच्या विरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली असून आंदोलन (Agitation) करण्यात आले आहे.

Pune : ...तर हंडा मोर्चा काढू, पाणीपुरवठ्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; महादेवनगरात केलं आंदोलन
पाण्याच्या समस्येवरून राष्ट्रवादीचं पुण्यातल्या महादेवनगरात आंदोलनImage Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Mar 24, 2022 | 2:19 PM
Share

पुणे : पुण्यातील दत्तनगर, भारतनगर, महादेव नगर आदी भागांत पाणी येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आक्रमक झाली आहे. महापालिकेच्या विरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली असून आंदोलन (Agitation) करण्यात आले आहे. प्रशासक विक्रम कुमारांच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. लवकरात लवकर पाणीपुरवठा (Water supply) सुरळीत केला नाही तर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. महादेवनगरमधील पाण्याच्या टाकीजवळ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला कार्यकर्त्या हंडा घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. एकीकडे प्रगती होत असताना महाराष्ट्र मागे चालला आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठीसुद्धा आंदोलन करावे लागत आहे, असे आंदोलक यावेळी म्हणाले. महापालिका प्रशासकाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात यावेळी घोषणा देण्यात आल्या.

राष्ट्रवादीच्या आंदोलनाचा पाहा व्हिडिओ –

उन्हाळ्यामुळे अधिक समस्या

दत्तनगर, भारतनगर, महादेव नगर यासह आसपासच्या परिसरात पाण्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. येथील नागरिकांना विशेषत: महिलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. पाणीपुरवठा सुरळीत नाही. आधीच उन्हाळा, त्यात आता पाण्याची ही समस्या यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. देश प्रगतीकडे चालला असताना राज्यात पाण्यासारख्या प्रश्नावरून आंदोलन करावे लागत आहे, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या आंदोलकांनी घेतली आहे. आता लवकरात लवकर समस्या न सोडवल्यास अधिक आक्रमक आंदोलन करणार असल्याचे आंदोलक म्हणाले आहेत.

आणखी वाचा :

Pune Metro| पुण्यात मेट्रो सुरु झाली खरं पण.. ‘बुधवार पेठ’ स्थानकाच्या नावाला पुणेकरांचा विरोध का?

ST employees strike : आडमुठी भूमिका कायम! स्वारगेट आगारातले कर्मचारी अजूनही संपावरच

PUNE | भयंकर! बाभळीच्या झाडाला स्त्री-पुरुषांचे फोटो, खिळ्याला काळ्या बाहुल्या, पुण्यात अघोरी प्रकार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.