AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

International Men’s Day: काही पुरुष वयाआधीच का दिसू लागतात म्हातारे? रोजच्या ‘या’ सवयी असतात कारणीभूत

दरवर्षी १९ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. अनेक पुरुष स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. त्यामुळे काही पुरुष कमी वयातच थकलेले आणि वयापेक्षा जास्त वयस्कर दिसू लागतात. असे होण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत, जाणून घेऊया

International Men’s Day: काही पुरुष वयाआधीच का दिसू लागतात म्हातारे? रोजच्या 'या' सवयी असतात कारणीभूत
काही पुरुष वयाआधीच का दिसू लागतात म्हातारे? Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Nov 19, 2026 | 11:11 AM
Share

सकाळी ८ वाजता घराबाहेर पडायचे आणि रात्री उशिरा घरी परतायचे, अशी अनेक पुरुषांची दिनचर्या असते. नोकरी, करिअर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना अनेक पुरुष स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. कामाचा ताण, अपुरी झोप आणि चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम त्यांच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर दिसू लागतो. काही पुरुष कमी वयातच थकलेले आणि वयापेक्षा जास्त वयस्कर दिसू लागतात. पुरुषांना त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी दरवर्षी १९ नोव्हेंबर रोजी इंटरनॅशनल मेन्स डे साजरा केला जातो. यंदाची थीम ‘The Future Is Everyone’ अशी असून, स्त्री-पुरुष समानता, परस्पर सहकार्य आणि पुरुषांचे योगदान अधोरेखित करण्याचा यामागे उद्देश आहे. जाणून घेऊया, कोणत्या रोजच्या सवयींमुळे पुरुष वयाआधीच थकलेले आणि वयस्कर दिसू लागतात.

वयाआधीच थकलेले आणि वयस्कर का दिसू लागतात?

वय वाढत जाते तसे त्याचे परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतात. मात्र, काही पुरुष त्यांच्या खऱ्या वयापेक्षा अधिक थकलेले आणि वयस्कर दिसतात. चेहरा निस्तेज होणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे, केस गळणे आणि सतत थकवा जाणवणे ही लक्षणे काही पुरुषांमध्ये अधिक दिसतात. यामुळे त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वावरही परिणाम होतो. यामागे रोजच्या जीवनातील काही सवयी कारणीभूत असतात. जाणून घेऊया, या सवयी कोणत्या आहेत.

पुरेशी झोप न घेणे

झोपेमुळे शरीराला नैसर्गिकरीत्या आराम मिळतो. मात्र, दररोज पुरेशी झोप न घेतल्यास त्याचा परिणाम त्वचेवर दिसू लागतो. त्वचा वेळेआधीच वयस्कर दिसू शकते आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण होऊ शकतात. कमी झोप आणि मोबाईलचा अतिवापर ही यामागची काही कारणे असू शकतात. झोपेच्या वेळी शरीर आणि त्वचा स्वतःची दुरुस्ती करण्याचे काम करतात.

सतत तणावात राहणे

अनेक पुरुषांना नोकरी, कुटुंब आणि आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे मन आणि शरीर दोन्ही तणावाखाली असतात. दीर्घकाळ तणाव घेतल्याने कॉर्टिसोलसारख्या हार्मोन्सच्या पातळीत बदल होऊ शकतो. याचा परिणाम पुरुष आणि महिला दोघांच्याही त्वचेवर दिसून येतो. त्यामुळे चेहऱ्यावर अकाली वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात.

धूम्रपान आणि मद्यपानाची सवय

महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये सिगारेट ओढण्याचे आणि मद्यपान करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. या दोन्ही सवयी आरोग्यासाठी हानिकारक असून शरीरावर अकाली वृद्धत्वाची लक्षणे दिसण्यास कारणीभूत ठरू शकतात. सिगारेटमध्ये असलेली हानिकारक रसायने त्वचेतील रक्तप्रवाहावर परिणाम करतात. या व्यसनांमुळे कौटुंबिक वाद आणि इतर समस्याही निर्माण होऊ शकतात.

आहाराकडे दुर्लक्ष करणे

आहारात फळे, भाज्या आणि आवश्यक पोषक घटकांचा पुरेसा समावेश नसल्यास त्याचा परिणाम त्वचा आणि केसांवर होऊ शकतो. व्हिटॅमिन सी कोलेजन तयार होण्यास मदत करते, तर शरीरातील ऊतींच्या दुरुस्तीसाठी प्रोटीन आवश्यक असते. लोह आणि व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे अशक्तपणा आणि थकवा जाणवू शकतो. अनेक पुरुष त्वचेचीही योग्य काळजी घेत नाहीत. काही पुरुष कामावरून उशिरा घरी येतात आणि रात्री उशिरा जेवतात. या सवयीमुळे पचनक्रिया बिघडू शकते आणि शरीर वेळेआधीच वयस्कर दिसू किंवा जाणवू शकते.

कमी पाणी पिणे

शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. यामुळे त्वचेतील ओलावा कमी होऊन ती कोरडी दिसू लागते. शरीराचे सामान्य कार्य सुरळीत राहण्यासाठी तसेच त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.

Follow Us
पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारलं थेट...
Sanjay Raut : पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारला नेमका प्रश्न...
बाळासाहेबांच्या चाहत्यांची माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय...
बाळासाहेबांच्या चाहत्यांची माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय विरोधकांना थेट इशारा
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाहांना पत्र
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाह आणि राहुल गांधींना पत्र!
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची...
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय...
CM Fadnavis On Water Scarcity : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे...
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे लोक... जरांगे पाटील स्पष्टच बोलले
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी बैठकीत...
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत!
भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच... मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक
भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच... मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक प्रकार
सोलापुरात ऊस दराचा तिढा कायम! जयकुमार गोरेंसोबतची बैठक निष्फळ, आता...
सोलापुरात ऊस दराचा तिढा कायम! जयकुमार गोरेंसोबतची बैठक निष्फळ, कारखानदारांनी मागितली 2 दिवसांची मुदत
दाऊद इब्राहिमच्या जुन्या वास्तव्यावर हातोडा! भेंडी बाजारातील इमारत...
दाऊद इब्राहिमच्या जुन्या वास्तव्यावर हातोडा! भेंडी बाजारातील मुसाफिरखाना इमारतीवर पालिकेची मोठी कारवाई