AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar | अजित पवार यांचा पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. अजित पवार गेल्या 32 वर्षांपासून बँँकेचे संचालक होते. पण त्यांनी आता अचानक संचालक पदाचा राजीनामा दिलाय.

Ajit Pawar | अजित पवार यांचा पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Oct 10, 2023 | 6:30 PM
Share

पुणे | 10 ऑक्टोबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिलाय. विशेष म्हणजे अजित पवार गेल्या 32 वर्षांपासून जिल्हा बँकेचे संचालक होते. अजित पवार 1991 पासून जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम पाहत होते. बँक राज्यात नंबर वनला आणण्याचं काम अजित पवारांनी केलं. पण त्यांनी आज अचानक पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. जिल्हा बँँकेच्या अध्यक्षांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय.

अजित पवार जिल्हा बँकेच्या प्रत्येक पंचावार्षिक निवडणुकीत सहभागी व्हायचे. पण त्यांनी आता आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिलाय. बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडी यांनीदेखील याबाबत माहिती दिलीय. त्यांनी याबाबतचं पत्रक देखील काढलं आहे. अजित पवारांनी संचालक पदाचा राजीनामा दिला असला तरी अजित पवार यांचं मार्गदर्शन घेऊ, असं बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडी यांनी सांगितलं आहे.

अजित पवार यांनी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा का दिला?

अजित पवार यांनी अचानक बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा का दिला? याबाबत विविध चर्चांना उधाण आलंय. पण यामागील खरं कारण समोर आलंय. “उपमुख्यमंत्रीपदाचा वाढता व्याप आणि पक्षाची वाढती जबाबदारी लक्षात घेता अजित पवार यांनी जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिलाय”, अशी माहिती समोर आलीय. अजित पवार हे याआधी चारवेळा राज्याचे उपमुख्यमंत्री होते. तसेच त्यांनी जलसंपदा विभागाची जबाबदारी सांभाळली आहे. पण तरीही त्यांनी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला नव्हता. मग अचानक का त्यांनी राजीनामा दिला? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. अजित पवार एका गटाने नेतृत्व करत आहेत. ते पक्षाचे प्रमुख असल्याचा त्यांच्या गटाचा दावा करण्यात येतोय. आता याप्रकरणी निवडणूक आयोगातही सुनावणी सुरु झालीय. तसेच सुप्रीम कोर्टातही याप्रकरणी सुनावणी होणार आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या कामाचा व्याप वाढला आहे. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्रीदेखील आहेत. ते त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे ओळखले जातात. प्रशासनात कुठेही दिरंगाई किंवा कमतरता दिसली तर अधिकाऱ्यांना धारेवर धरतात.

Follow Us
मोठी बातमी! अखेर अभिजीत दीपके विदेशी फंडींगबाबत व्यक्त, थेट अमित शाहां
मोठी बातमी! अखेर अभिजीत दीपके विदेशी फंडींगबाबत व्यक्त, थेट अमित शाहांचं नाव घेत हल्ला
हे कुठले झाले आमच्या पक्षाचे मालक? शिंदेंसोबतचा प्रत्येक माणूस अपात्र
Sanjay Raut Uncut | हे कुठले झाले आमच्या पक्षाचे मालक? शिंदेंसोबतचा प्रत्येक माणूस अपात्र ठरेल; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी राऊतांची स्फोटक प्रतिक्रिया
Gen-Z ने जंतर-मंतरवर येऊन फक्त भारताला... रामदेव बाबांचा आरोप
Gen-Z ने जंतर-मंतरवर येऊन फक्त भारताला... रामदेव बाबांच्या धक्कादायक आरोपांनी खळबळ
कॅप नं. 278 म्हणत अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला भावनिक निरोप
मोठी बातमी! कॅप नं. 278 म्हणत अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला भावनिक निरोप; व्हिडिओ शेअर करत केली घोषणा
गृहमंत्री अमित शहांनी गोळीबाराचे आदेश दिले असो की नसो दोषी तेच, कारण..
गृहमंत्री अमित शहांनी गोळीबाराचे आदेश दिले असो की नसो दोषी तेच, कारण.... बड्या नेत्याच्या विधानानं खळबळ
तुकाराम मुंढेंविरोधात तब्बल 29 कर्मचाऱ्यांचा एल्गार...
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंविरोधात तब्बल 29 कर्मचाऱ्यांचा एल्गार; थेट मंत्र्यांकडे घेतली धाव
तिला' मंत्रिमंडळात ठेवलं आहे, अन्... गिरीश महाजन आणि विजय चौधरींमधील..
तिला' मंत्रिमंडळात ठेवलं आहे, अन्... गिरीश महाजन आणि विजय चौधरींमधील कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?
धनुष्यबाण कोणाच्या हाती? ठाकरे की शिंदे?; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Shiv Sena | धनुष्यबाण कोणाच्या हाती? ठाकरे की शिंदे?; शिवसेना चिन्ह वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय, त्यांनीच... दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी