दावोस दौऱ्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांना अजित पवार यांचा टोला; म्हणाले, “त्यांनीचं एमओयू केल्याची चर्चा”

काही उद्योगपती आपल्या महाराष्ट्रात येऊन एमओयू करू पाहत आहेत. ज्यांचे युनिट महाराष्ट्रात आहेत, अशांनीचं तेथे एमओयू केले. असं दबक्या आवाजात काही जण बोलतात.

दावोस दौऱ्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांना अजित पवार यांचा टोला; म्हणाले, त्यांनीचं एमओयू केल्याची चर्चा
अजित पवार Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 5:25 PM

पुणे : जागतिक आर्थिक परिषदेच्या दावोस दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सामंजस्य करार केले. दावोस येथे पहिल्या दिवशी ४५ हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले. पुणे येथे २५० कोटी रुपये खर्चाचा रुखी फुड्सचा ग्रीनफिल्ड अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. औरंगाबाद येथे १२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा रिन्युएबल प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यामुळं ६,३०० जणांना रोजगार मिळेल. मुख्यमंत्री शिंदे यांनी दावोस दोऱ्यात काय झालं, हे सांगितलं. त्यावर आता अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्यांचे युनिट महाराष्ट्रात त्यांनीच राज्यात दावोसमध्ये करार केल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून अजित पवार (Ajit Pawar) यांनी टोले लगावले.

असं दबक्या आवाजात बोललं जातं

अजित पवार म्हणाले, दावोसच्या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्या शेजारी बसलो असताना त्यांना विचारलं. ते म्हणाले, आम्ही एमओयू केले. त्यातील काही उद्योगपती आपल्या महाराष्ट्रात येऊन एमओयू करू पाहत आहेत. ज्यांचे युनिट महाराष्ट्रात आहेत, अशांनीचं तेथे एमओयू केले. असं दबक्या आवाजात काही जण बोलतात.

पोटनिवडणुकीबाबत कार्यकर्ते म्हणतात,…

पोटनिवडणुकीच्या दोन्ही जागा लढविण्यााची कार्यकर्त्यांची मागणी आहे, असं अजित पवार यांनी म्हंटलं. पिंपरी चिंचवड, कसब्याच्या पोटनिवडणुकीवर अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, ज्यावेळी अशाप्रकारच्या पोटनिवडणुका लागतात. त्यावेळी आम्ही मुंबईत असताना सर्व जण चर्चा करतो. मुंबईत २३, २४ जानेवारीला आहोत.

भाजपकडून यांची नावं चर्चेत

भाजपचा उमेदवार कोण राहणार हे मला आता सांगता येणार नाही. शंकर जगताप म्हणून लक्ष्मणराव जगताप यांचे बंधू आहेत. लक्ष्ण जगताप यांच्या पत्नी या दोघांचं नाव त्यांनी पार्टीकडे कळविलं आहे.

कसब्यामध्ये त्या भागातल्या मान्यवरांच्या नावांची चर्चा सुरू आहे. त्यात राष्ट्रवादीकडून भिडकर आणि इतर नावांचा समावेश असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.