AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिबेवाडी परिसरात MNG लाईनला मोठी आग ; पण नगरसेविकेच्या सतर्कतेमुळे अनर्थ टाळला

रात्रीच्या सुमारास मोठा आवाज होत अचानकपणे आगीचा भडका उडाला. या आवाजाने परिसरातील नागरिक जागे झाले. घटनेच्या जवळच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या नगरसेविका यांनी सर्तकता दाखवत  स्थानिक नागरिकांना घटनास्थळापासून सुरक्षित ठिकाणी नेले. अग्नीशामक दलाला याची माहिती देत आग विझवण्यात आली.

बिबेवाडी परिसरात MNG लाईनला मोठी आग ; पण नगरसेविकेच्या सतर्कतेमुळे अनर्थ टाळला
Bibwewadi Fire
| Edited By: | Updated on: Nov 26, 2021 | 3:45 PM
Share

पुणे –  शहरातील बिबेवाडी परिसरात जेसीबीमुळे MNGL ची लाईन फुटल्याने मोठी आग भडकल्याची घटना नुकतीच घडली आहे. सुमारे तास – दीड तास आग भडकत होती. मात्र स्थानिक व नगरसेविका रुपाली धाडवे यांच्या सर्तकतेमुळे कोणत्याही प्रकारची हानी न होता आग विझवण्यात अग्निशामक दलाला यश आले.

याबाबतची माहिती अशी की,  रात्रीच्या सुमारास मोठा आवाज होत अचानकपणे आगीचा भडका उडाला. या आवाजाने परिसरातील नागरिक जागे झाले. घटनेच्या जवळच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या नगरसेविका यांनी सर्तकता दाखवत  स्थानिक नागरिकांना घटनास्थळापासून सुरक्षित ठिकाणी नेले. अग्नीशामक दलालाला याची माहिती देत आग विझवण्यात आली.

पोलिसांच्या सर्तकतेमुळं वाचले तरुणाचे प्राण दुसरीकडे कुटुंब कलहामुळं गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी वाचवले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या काही मिनिटात घटना स्थळ गाठल्याने तरुणाचे प्राण वाचले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात बिनतारी संदेश यंत्रणेवर एक तरुण आत्महत्या करत असल्याचा कॉल आंबेगाव येथील सिंहगड कॅम्पस येथून आला. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता काही मिनिटातच घटना स्थळ गाठले. घटनेच्या ठिकाणी सदर तरुण खुर्चीवर उभे राहून साडीचा साह्याने गळफास घेत होता. पोलिसांनी वेगाने हालचाली करत संबंधित तरुणाला खाली घेतले. तसेच त्या तरुणाला समजावून सांगत आत्महत्येपासून त्याचे मन परिवर्तन केले.

स्थनिकांनी मानले आभार पोलीस कर्मचारी ब्रह्मनंद केंद्रे व नानासो खाडे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे संबंधित तरुणाचा जीव वाचल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. यासाठी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदनही केले आहे.

राणे म्हणाले, मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार; नाना पटोले म्हणतात, भाजपच्या भविष्यवाणीला काही अर्थ नाही

अभिनेता मंगेश देसाईंची नवी इनिंग, निर्माता म्हणून मनोरंजन विश्वात करणार पदार्पण!

क्रिप्टोकरन्सीच्या किमतीमध्ये वाढ; बिटकॉईन 58,590 डॉलर वर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.