क्रिप्टोकरन्सीच्या किमतीमध्ये वाढ; बिटकॉईन 58,590 डॉलर वर

गेल्या काही दिवसांपासून क्रिप्टोकरन्सीच्या किमतीमध्ये घसरण सुरू होती. अखेर या घसरणीला ब्रेक लागला असून, क्रिप्टोकरन्सीच्या किमती वधारलल्या आहेत. प्रमुख क्रिप्टोकरन्सी असेल्या बिटकॉईनच्या किमतीमध्ये एक टक्क्यांनी वाढ झाली आहे.

क्रिप्टोकरन्सीच्या किमतीमध्ये वाढ; बिटकॉईन 58,590 डॉलर वर

Bitcoin Prices Today: गेल्या काही दिवसांपासून क्रिप्टोकरन्सीच्या किमतीमध्ये घसरण सुरू होती. अखेर या घसरणीला ब्रेक लागला असून, क्रिप्टोकरन्सीच्या किमती वधारलल्या आहेत. प्रमुख क्रिप्टोकरन्सी असेल्या बिटकॉईनच्या किमतीमध्ये एक टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे बिटकॉईनची किंमत आता 58,590 डॉलर प्रति बिटकॉईनवर पोहोचली आहे. वर्षभरात बिटकॉईनच्या दरामध्ये तब्बल 103 टक्क्यांची वाढ झाली आहे. यासोबतच क्रिप्टोच्या मार्केट कॅपमध्ये देखील वाढ झाली असून, मार्केट कॅप 2.8 ट्रिलियन डॉलरवर पोहोचली आहे.

इथेरियमच्या दरात वाढ

बिटकॉईन पाठोपाठ इथेरियम ही दुसरी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. इथेरियमच्या दरात 4 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. इथेरियमचे दर 4,486 डॉलरवर पोहोचले आहेत. ही इथेरियमची आतापर्यंतची सर्वाधिक किमत आहे. बिटकॉईनसोबतच इथेरियम या क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक देखील वाढत आहे. डॉगकॉईन, सिब्ब इनुच्या किमती देखील काही अंशांनी वाढल्या आहेत.  

भारतात क्रिप्टोकरन्सी अधिकृत होणार?

दरम्यान भारतामध्ये क्रिप्टोकरन्सीला अधिकृत परवानगी देण्यात यावी की नाही? याबाबत केंद्र सरकार संभ्रमात आहे. क्रिप्टोकरन्सीवर निर्णय घेण्यासाठी एका समितीची स्थापना देखील करण्यात आली आहे. या समितीने नुकताच आपला अहवाल केंद्राकडे सादर केला आहे. भारतामध्ये क्रिप्टोकरन्सीला पूर्णपणे बंदी घालता येणार नाही, मात्र त्याचे नियमन केले जाऊ शकते असे या अहवालात म्हटले आहे. तर दुसरीकडे भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून क्रिप्टोकरन्सीबाबत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या 

शेअर बाजारात घसरण; चालू आठवड्यात कोट्यावधीचे नुकसान, आयटी क्षेत्रात गुंतवणुकीचा तज्ज्ञांकडून सल्ला

शेअरबाजारात भूंकप! सेन्सेक्स 1420 अंकांनी कोसळला, गुंतवणुकदाराना कोट्यावधीचा फटका

महाराष्ट्रातल्या मराठी उद्योगपतीच्या घरातला वाद कसा मिटणार? किर्लोस्करांना सुप्रीम कोर्टानं मार्ग दाखवला

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI