AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातल्या मराठी उद्योगपतीच्या घरातला वाद कसा मिटणार? किर्लोस्करांना सुप्रीम कोर्टानं मार्ग दाखवला

किर्लोस्कर कुटुंबातील संपत्तीचा वाद आता सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडच्या वतीने (KBL)कौटुंबीक वादासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचीका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थिने वाद सुटल्यास चांगले होईल असे म्हटले आहे.

महाराष्ट्रातल्या मराठी उद्योगपतीच्या घरातला वाद कसा मिटणार? किर्लोस्करांना सुप्रीम कोर्टानं मार्ग दाखवला
ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातल्या तीन याचिकांवर आज सुनावणी
| Edited By: | Updated on: Nov 26, 2021 | 12:16 PM
Share

मुंबई : (Kirloskar Family Dispute) किर्लोस्कर कुटुंबातील संपत्तीचा वाद आता सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडच्या वतीने (KBL)कौटुंबीक वादासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचीका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने प्रतिवादी असलेले अतुल चंद्रकांत किर्लोस्कर आणि अन्य 13 जनांना वाद मध्यस्थीने सोडवण्याचा आदेश दिला आहे. जर हा वाद मध्यस्थीने न सुटल्यास न्यायालयाला या प्रकरणात अंतरीम आदेश द्यावे लागतील असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. दरम्यान यापूर्वी हा खटला मुंबई उच्च न्यायालयात चालू होता. मुंबई उच्च न्यायलयाने देखील हा खटला कुटुंबातील सदस्यांच्या सहमतीने सोडवण्यात यावा असे म्हटले होते. आता उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात केबीएलने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

काय आहे प्रकरण?

केबीएलचे प्रमुख असलेले संजय किर्लोस्कर यांनी आरोप केला आहे की,  त्यांचे भाऊ अतुल किर्लोस्कर आणि संजय किर्लोस्कर यांच्या मालकी अंतर्गत येणाऱ्या कंपन्या या किर्लोस्कर बँन्डचा चुकीच्या पद्धतीने वापर करून जनतेची दिशाभूल करत आहेत. तर दुसरीकडे मात्र आपल्या विरोधात करण्यात आलेले आरोप अतुल आणि राहुल यांनी फेटाळून लावले आहेत. दरम्यान दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टाने असे म्हटले आहे की, या  खटल्याशी संबंधित पाच कंपन्यांपैकी तीन कंपन्यांना सर्वोच्च न्यायलयाच्या माजी न्यायाधीश इंदु मल्होत्रा यांची मध्यस्थी मान्य आहे. मात्र यातील दोन कंपन्या या मध्यस्थीसाठी तयार नाहीत. मध्यस्थी करायची असेल तर सर्व कंपन्यांमध्ये झाली पहिजे. अन्यथा सर्वोच्च न्यायलयाला अंतरिम आदेश द्यावे लागतील.

जुलैमध्ये सुरू झाला वाद

हा वाद मागील वर्षीच्या जुलै महिन्यापासून सुरू आहे. अतुल आणि राहुल किर्लोस्कर हे दोघे मिळून पाच कंपन्यांचे मालक आहेत. दरम्यान त्यांनी आपल्या कंपन्यांची नवी ओळख तयार करण्यासाठी कंपन्यांमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला होता. या अंतर्गत कंपनीचा लोगो, कलर आणि अन्य काही गोष्टी बदलण्यात आल्या. मात्र या पाच कंपन्याचा लोगो हा किर्लोस्कर यांनी 130 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या कंपनीशी मिळता जुळता आहे. यातून संबंधित कंपन्यांनी 130 वर्षांची परंपरा असलेल्या किर्लोस्कर कंपनीची प्रतिमा चोरण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप संजय किर्लोस्कर यांनी केला आहे.

संबंधित बातम्या 

देशी की विदेशी? परदेशी ब्रँडच्या दारूच्या किंमतीत थेट 36 टक्क्यांनी घट, सरकारची कृपा

आधारच्या मदतीने रोखता येणार कर चोरी; ‘एनपीसीआय’चा दावा

अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी सरकार करणार 2.5 लख कोटींचा अतिरिक्त खर्च; ‘या’ गोष्टींवर मिळणार सबसीडी

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी