Bird Flu | पुणे सोलापूर सह नांदेडमधील दोन तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव

| Updated on: Jan 17, 2021 | 4:00 PM

राज्यातील पुणे, सोलापूर आणि नांदेड जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा प्रसार झाल्याचं समोर आलं आहे. (Bird Flu found in Pune Solapur and Nanded)

Bird Flu | पुणे सोलापूर सह नांदेडमधील दोन तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव
इंदापूर तालुक्यातील रुई गावामध्ये कोंबड्या दगावल्या
Follow us on

पुणे : राज्यात बर्ड फ्लूचा संसर्ग वाढत असल्याच समोर येत आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, मुळशी तालुक्यात कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि नांदेड जिल्ह्यातील कंधार आणि माहूर तालुक्यातही दोन गावांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झाला असल्याचं समोर आलं आहे. प्रयोगशाळांकडून कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनं झाल्याचा अहवाल आल्यानंतर कोंबड्या नष्ट केल्या जात आहेत. बर्ड फ्लूमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तर, चिकन व्यावसायिकांना देखील याचा जोरदार फटका बसला आहे. ( Bird Flu found in Pune Solapur and Nanded Villages administration killed thousands hens )

इंदापूर तालुक्यातील रुई गावात कोंबड्या दगावल्या

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील रुई गावात घरगुती नऊ देशी कोंबड्या अचानक दगावल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. मृत पावलेल्या नऊ कोंबड्यांच्या नमुन्यांची तपासणी पुण्याच्या प्रयोगशाळेमध्ये करण्यात येणार असून त्यासाठी नमुने पाठवल्याची माहिती इंदापूरचे पशुवैद्यकीय अधिकारी रामचंद्र शिंदे यांनी माहिती दिली आहे.

इंदापूर तालुक्यातील रुई गावातील एका शेतकऱ्याच्या नऊ घरगुती देशी कोंबड्या आज सकाळी अचानक संशयितरित्या मरण पावल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. मृत पावलेल्या कोंबड्यांची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी रामचंद्र शिंदे यांनी तात्काळ रुई गावात जात तेथील मृत कोंबड्यांचे नमुन्यांचे अहवाल पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविले आहेत. मात्र, तालुक्यात भीतीचे वातावरण तयार झालेले असून या कोंबड्यांचा अहवाल येईपर्यंत चिकन व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

धावत्या जगाचं, धावतं बुलेटीन, पाहा न्यूज टॉप 9, दररोज रात्री 9 वा. टीव्ही 9 मराठीवर

दौंड तालुकक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव

दोन दिवसापूर्वीच पुणे जिल्ह्यातील मावळ आणि दौंड तालुक्यात बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. मावळ तालुक्यातील पाच हजार पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. दौंड तालुक्यातील बोरीबेल येथील 418 पक्षी नष्ट केलेले आहेत. पुणे जिल्ह्यात बोर्ड फ्लू’चा शिरकाव झाल्यानंतर चिकन उत्पादक मोठ्या चिंतेत आलेले आहेत. दौंड तालुक्यातील बोरिबेल येथे13 घरगुती कोंबड्या वृत्त पावल्याने त्या परिसरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या 418 कोंबडया पशुसंवर्धन विभागाने काल नष्ट केल्या आहेत.

मावळ आणि मुळशी तालुक्यात पाच हजारांहून अधिक कोंबड्या नष्ट

मुळशी तालुक्यातील नांदे येथे पुणे जिल्ह्यातील पहिला बर्ड फ्लूचा विषाणू सापडला असल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. मावळ आणि मुळशीतील सर्व टीमच्या सहाय्याने संध्याकाळ पर्यंत तेथील पोल्ट्रीतील सुमारे पाच हजाराहून अधिक कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे, अशी माहिती तालुका पशूसंवर्धन अधिकारी डॅा.सचिन काळे यांनी दिली. नांदे येथील शिंदे वस्तीवर राहत असलेले अमित अशोक रानवडे यांच्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या पोल्ट्रीतील चार कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या होत्या. त्यानंतर रोज चार ते पाच कोंबड्यांचा मृत्यू होऊ लागला. त्यामुळे चार दिवसांपूर्वी तेथील पोल्ट्री मालकाने मृत कोंबड्यांची तपासणी पुणे येथील औंधच्या प्रयोगशाळेत करून घेतली. त्यावेळी त्यात बर्ड फ्लू विषाणू नसल्याचा अहवाल आला होता. मात्र तरीही कोंबड्यांचे मरण्याचे प्रमाण वाढतच गेल्याने आणखी नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशूरोग संस्थेकडे पाठविला. त्याचा अहवाल नुकताच काल शुक्रवार उशिरा आला आणि त्यात या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लू च्या विषाणूने झाल्याचे निष्पन्न झाले.

सोलापुरातील मंगळवेढ्यात 1 हजार कोंबड्या नष्ट

सोलापूर जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संसर्ग आढळून आला आहे. मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी येथील पोल्टी फार्म मध्ये काही कोंबड्याचा अलीकडेच मृत्यु झाला होता. त्यानंतर मृत कोंबडयाची प्रयोग शाळेत तपासणी केली असता त्यांचा बर्ड फ्लूने मृत्यु झाल्याचा अहवाल आला आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने खबदारीचा उपाय म्हणून एक किलो मीटर परिसर सील केला आहे. बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये यासाठी पशुसंवर्धन विभागाने परिसरातील सुमारे एक हजाराहून कोंबड्या नष्ट करण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने एक किलोमीटर परिसरातील सर्व देशी व बॉयलर कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार जंगलगी,सलगर या भागातील चार शेतकऱ्यांच्या सुमारे एक हजार 50 कोंबड्या नष्ट केल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव

नांदेड जिल्ह्यातील दोन गावांत बर्ड फ्लूची लागण झाल्याचा अहवाल भोपाळ इथल्या प्रयोग शाळेने दिलाय. कंधार तालुक्यातील नावंद्याचीवाडी, माहूर तालुक्यातील पापलवाडी इथल्या मृत कोंबड्याना बर्ड फ्लूची लागण झाल्याचा अहवाल आलाय. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील या दोन्ही गावांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार “ संसर्गग्रस्त क्षेत्र “म्हणून घोषित करण्यात आलेय. तेथे निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांनुसार बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या ठिकाणापासून 1 किमी अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी नष्ट करण्याची कार्यवाही सुरू आहे तसेच उर्वरित ठिकाणी सर्वेक्षण सुरू ठेवण्यात आले आहे. बर्ड फ्लूची लागण झाल्यामुळे दोन्ही गावातील कुक्कुटपालन करणारे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.

संबंधित बातम्या:

Bird Flu | कोंबडीचे मांस आणि अंडी खाल्ल्याने ‘बर्ड फ्लू’चा धोका? वाचा संशोधन काय म्हणतेय…

Bird Flu Prevention Guidelines | बर्ड फ्लू रोखण्यासाठी पशूसंवर्धन विभागाकडून मार्गदर्शक सूचना, चिकन खरेदी करताना घ्या ही काळजी!

( Bird Flu found in Pune Solapur and Nanded Villages administration killed thousands hens )