Amit Shah | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रात्री उशिरा पुण्यात दाखल, काय कारण?

Amit Shah | अमित शाह यांच्यासोबत भाजपाचे कोणते अन्य मोठे नेते पुण्यामध्ये आहेत?. अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याचा राजकीय अर्थ काढला जाऊ शकतो.

Amit Shah | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रात्री उशिरा पुण्यात दाखल, काय कारण?
Amit Shah
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 25, 2023 | 8:02 AM

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रात्री उशिरा पुण्यात दाखल झाले. अमित शाह यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा पुण्यामध्ये आहेत. अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याचा राजकीय अर्थ काढला जाऊ शकतो. पण अमित शाह राजकीय भेटीगाठींसाठी नव्हे, तर मदनदास देवी यांच्या अंत्यदर्शनासाठी आले आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचं काल पुण्यात निधन झालं. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

भाजपाचे आणखी कोणते नेते पुण्यात?

मदनदास देवी यांच्या अंत्यदर्शनासाठी भाजपाचे दिग्गज नेते पुण्यात पोहोचले आहेत. सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंत्यदर्शनाला उपस्थित राहणार आहेत.


रात्रीच हे सर्व नेते पुण्यात मुक्कामी आहे. मदनदास देवी यांचे पार्थिव संघाच्या पुण्यातील कार्यालयात दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे.

अमित शाह यांनी टि्वटमध्ये काय म्हटलय?

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक श्री मदनदास देवी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. निस्वार्थ भावनेने त्यांनी राष्ट्रसेवा व संघ कार्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं. मदनदास देवी यांच्या निधनाने संघटनेची न भरून येणारी हानी झाली आहे. कोट्यावधी कार्यकर्त्यांसाठी ते प्रेरणास्त्रोत होते” असं अमित शाह यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.