धरणात पोहायला गेल्या आणि जीव गमावून बसल्या, दोन युवतींचे मृतदेह सापडले

| Updated on: May 15, 2023 | 2:33 PM

खडकवासला धरणात पाणी आहे. या पाण्यात मनसोक्त बुडावेसे वाटणे साहजिक आहे. त्यामुळे ७ मुली पाण्यात उतरल्या. पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही.

धरणात पोहायला गेल्या आणि जीव गमावून बसल्या, दोन युवतींचे मृतदेह सापडले
khadakwasla
Follow us on

पुणे : उन्हाचे दिवस असल्याने बहुतेकांना पोहण्याचा मोह होतो. खडकवासला धरणात पाणी आहे. या पाण्यात मनसोक्त बुडावेसे वाटणे साहजिक आहे. त्यामुळे ७ मुली पाण्यात उतरल्या. पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. एकमेकींना सावरण्याचा प्रयत्न केला. पण, त्या खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागल्या. तेवढ्यास बाजूला असलेले काही लोक मदतीला धावले. पाच मुलींना बाहेर काढण्यात त्यांना यश आले. पण, दोन मुलींचे मृतदेहच सापडले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सिंहगड किल्ला आणि खडकवासला धरण परिसर पर्यटकांसाठी बंद करण्यात आला. पर्यटन बंदी असताना ७ मुली पाण्यात उतरल्या. त्यामुळे त्यांना परवानगी कुणी दिली होती, असा प्रश्न निर्माण होत आहे. खसकवासला धरण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

दोन मुलींचा मृत्यू

खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुली बुडाल्या. ७ पैकी ५ मुलींना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. तर, २ मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत पोहण्यासाठी गेलेल्या सात मुली पाण्यात पडल्या होत्या. एका मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश मात्र दुसऱ्या मुलीचा मृतदेह शोधण्याचे काम सुरूच होते.

हवेली पोलीस घटनास्थळी दाखल

स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे पाच मुलींना वाचविण्यात यश आलं. मात्र. दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला. हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

स्थानिकांनी घेतली धाव

कलमाडी फार्म हाऊसजवळ खडकवासला धरणाच्या पाण्यात आज सकाळी सात मुली पोहण्यासाठी उतरल्या होत्या. पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वच्या सर्व सात मुली पाण्यात बुडू लागल्या. जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी मुलींना वाचविण्यासाठी धाव घेतली. त्यामुळे पाच मुलींचे प्राण वाचले. पण, दोन मुली पाण्याखाली गेल्या होत्या. त्यामुळे त्यांचे मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आले.