अजित पवार पहाटेच उतरले रस्त्यावर, पुण्यातील आयटी पार्कमध्ये जाऊन दिले असे आदेश

उपमुख्यमंत्री अजित पवार मेट्रो लाईन तीन हिंजवडीची पाहणी केली. प्रस्तावित मेट्रोच्या जिन्याला पर्यायी जिना तयार करा आणि तो रस्त्याच्या बाजूला घ्या, एक आठवड्याच्या आत या ठिकाणी बदल हवा, अशा सूचना मेट्रो प्रशासनावर दिल्या.

अजित पवार पहाटेच उतरले रस्त्यावर, पुण्यातील आयटी पार्कमध्ये जाऊन दिले असे आदेश
हिंजवडीतील समस्यांची पाहणी करताना अजित पवार.
| Updated on: Jul 13, 2025 | 7:28 AM

शिक्षणाची राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहर आयटी सिटी म्हणून ओळखले जाऊ लागले. आयटी सिटीमधील हिंजवडी भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. दहा मिनिटांचा पावसात हा भाग वॉटर पार्क होत आहे. त्यासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. त्यामुळे रविवारी पहाटेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार रस्त्यावर उतरले. ते थेट हिंजवडीत पोहचले. त्या भागातील समस्या जाणून घेतल्या. तसेच उपाययोजना करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

अतिक्रमण काढण्याचे आदेश

रविवारी पहाटे सहा वाजेपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आयटी पार्क हिंजवडीत विविध समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरले. या भागात साचणारे पावसाचे पाणी, रस्त्याची समस्या, वाहतूक कोंडी यावर उपाययोजना करण्यासाठी अजित पवारच हिंजवडीत आले. यावेळी रस्त्यावर असलेले अतिक्रमण त्यांनी पाहिले. त्यानंतर सरकारी रस्ता अडवणाऱ्या व्यक्तींवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी 353 कलमानुसार गुन्हे दाखल करा, असे स्पष्ट आदेश पीएमआरडी आणि संबंधित प्रशासनाला अजित पवार यांनी दिले. रस्त्याला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मोबदला देऊ, असे अजित पवार यांनी सांगितले.

नाला बुजवत इमारती?

हिंजवडीमध्ये थोडासा पाऊस पडला तरी वॉटर पार्कसारखी परिस्थिती होते. त्या भागाची पाहणी अजित पवार यांनी केली. त्यावेळी त्या ठिकाणी मोठा नाला होतो. तो बुजवत बहुमजली इमारती, कंपन्या बांधल्या गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. दोन मोठे प्रकल्प आणि एक कंपनी यांनी मिळून एक मोठा नाला बुजवल्याचे नागरिकांनी त्यांना सांगितले. त्यामुळे हिंजवडीच्या फेज थ्रीमध्ये थोडा पाऊस पडला तरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साठत असल्याचे लक्षात आले. त्यावर अजित पवार यावर काय कारवाई करतात? हेच पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.

मेट्रो प्रशासनला दिल्या सूचना

उपमुख्यमंत्री अजित पवार मेट्रो लाईन तीन हिंजवडीची पाहणी केली. प्रस्तावित मेट्रोच्या जिन्याला पर्यायी जिना तयार करा आणि तो रस्त्याच्या बाजूला घ्या, एक आठवड्याच्या आत या ठिकाणी बदल हवा, अशा सूचना मेट्रो प्रशासनावर दिल्या. यावेळी आयटीईन्सकडून अजित पवार यांना समस्या सांगण्यात आल्या. तसेच ज्या रस्त्यावरून पावसामुळे साचलेल्या पाण्यातून पीएमपीएमएलची बस गेली होती, त्या रस्त्यावर अजित पवार रस्त्यावरून चालत गेले. त्यांनी त्या भागाची पाहणी केली.