एकनाथ शिंदेंचा शेवटचा दसरा मेळावा ठरणार? कुणी केला सर्वात मोठा दावा; ट्विट व्हायरल

ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. हा त्यांचा शेवटचा मेळावा ठरू शकतो, असे सरोदेंनी ट्विट केले. शिवसेना पक्षाच्या चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर हे विधान आले आहे. न्यायालयाचा निकाल शिंदे गटाच्या राजकीय भवितव्यावर परिणाम करेल, असा त्यांचा अंदाज आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

एकनाथ शिंदेंचा शेवटचा दसरा मेळावा ठरणार? कुणी केला सर्वात मोठा दावा; ट्विट व्हायरल
Eknath Shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 20, 2026 | 1:06 PM

महाराष्ट्रात आज पाच दसरा मेळावे होत आहेत. त्यापैकी एक दसरा मेळावा झाला आहे. अजून चार बाकी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा पार पडला आहे. पंकजा मुंडे, मनोज जरांगे पाटील, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मेळावे होणार आहेत. यापैकी ठाकरे आणि शिंदे यांच्या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. ठाकरेंची गर्जना आणि शिंदेंची डरकाळी काय असेल? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांचा हा कदाचित शेवटचाच दसरा मेळावा असेल, असं मोठं विधान ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

असीम सरोदे यांनी सकाळी सकाळीच ट्विट करून शिंदे गटाला दसऱ्याच्या दिवशीच टेन्शन दिलं आहे. पक्षाचं नाव चोरून मिळवलेली ओळख घेऊन सत्तानाथ यांचा हा शेवटचा दसरा मेळावा ठरला, तर आश्चर्य वाटायला नको! आधी पक्षचोरी, मग निवडणुकीतल्या कथित गैरप्रकारांचे प्रयोग आणि आता सत्तेच्या नाटकाचा अखेरचा अंक! लोकशाहीच्या रंगमंचावर सगळे प्रयोग यशस्वी झाले असं वाटत असलं, तरी न्यायालयाचा पडदा सत्तेचा खेळ संपवेल, हे अजून बाकी आहे! कारण सत्ता कितीही मोठी असली, तरी लोकशाहीत अंतिम शब्द सत्तेचा नसतो—तो संविधानाचा आणि न्यायाचा असतो!, अशी थेट प्रतिक्रिया असीम सरोदे यांनी ट्विटमधून व्यक्त केली आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. तसेच सरोदे यांचं हे ट्विट वेगाने व्हायरल होत आहे.

Loading...

 

शिवसेना कुणाची?

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षावर सुनावणी सुरू आहे. या महिन्याच्या अखेरीस ही सुनावणी संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवेसना ठाकरेंची होणार की शिंदेंची? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद करत शिवसेना ठाकरेंचीच कशी आहे? याचा युक्तिवाद केला आहे.

तर, दुसरीकडे शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनीही सर्वोच्च न्यायालयात आक्रमकपणे शिंदे गटाची बाजू मांडली आहे. शिवेसना शिंदे गटाचीच असल्याचं त्यांनी कोर्टासमोर मांडलं आहे. दोन्ही गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद करताना विविध खटल्यांचा दाखलाही दिला आहे. त्यामुळे आता कोर्ट त्यावर काय निर्णय देणार हे पाहावं लागणार आहे. कोर्टाचा हा निकाल केवळ निकाल राहणार नसून तो ऐतिहासिक निकाल असणार आहे. त्यामुळे भविष्यातील राजकीय पक्षांचे वाद सोडवण्यात हा निकाल महत्त्वाचा आधार असणार आहे. त्यामुळेच देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us