AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत मुलगाही पडला, हसन मुश्रीफ यांची पहिली प्रतिक्रिया, थेट महायुतीवरच…

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मुलाच्या आणि महायुतीच्या पराभवानंतर हसन मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. पराभव स्वीकारत त्यांनी कार्यकर्त्यांना निराश न होण्याचा सल्ला दिला. आत्मचिंतन बैठकीची घोषणा करत मुश्रीफ यांनी महायुतीतील अंतर्गत भांडणे आणि मतदारांना युती न आवडल्याची शक्यता व्यक्त केली. पुढील रणनीती ठरवण्यासाठी सर्वजण एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.

Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत मुलगाही पडला, हसन मुश्रीफ यांची पहिली प्रतिक्रिया, थेट महायुतीवरच...
Hassan Mushrif Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 20, 2026 | 12:47 PM
Share

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीला मोठा झटका बसला आहे. या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने दणदणीत यश मिळवलं आहे. या निवडणुकीत राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव आणि गोकूळचे विद्यमान चेअरमन नाविद मुश्रीफ यांचा दारूण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीचं नेतृत्व हसन मुश्रीफ यांच्याकडे होतं. त्यामुळे हा मुश्रीफ यांनाच मोठा झटका असल्याचं सांगितलं जात आहे. या निवडणुकीनंतर हसन मुश्रीफ यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया देऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आपला पराभव झालाय. पराभवामुळे खचून जाऊ नका. निराश होऊ नका. उद्यापासून आपण पुन्हा एकदा कामाला लागू या, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे.

आत्मचिंतनासाठी बैठक

उद्या संध्याकाळी 5 वाजता पराभवाबद्दलची आत्मचिंतन बैठक होणार आहे. या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहून आत्मचिंतन करायचं आहे. पुढची रणनीती ठरवायची आहे, असं सांगतानाच पदवीधर निवडणुकीसाठी आपण मोठी नोंदणी केली आहे. ज्यांची ज्यांची नोंदणी झालेली आहे, त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यायचे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल कोल्हापुरात होते. यावेळी त्यांना महायुतीचा उमेदवार निवडून देण्याचा आम्ही शब्द दिला आहे. तो शब्द आपल्याला पाळायचा आहे, असं मुश्रीफ म्हणाले.

त्यानंतरची युती आवडली नसेल

आमचा झालेला पराभव आम्ही स्वीकारत आहोत. या निवडणुकीत शेवटपर्यंत महायुतीत भांडणे सुरू होती. या भांडणानंतर आमची युती झाली. त्यामुळे ही युती कदाचित मतदारांना आवडली नसेल, असं सांगतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण कल्याणाच्या भूमिकेतून गोकुळ दूध संघाच्या उत्कर्षासाठी लागेल ते सहकार्य करू, असं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.

नेमकं काय घडलं?

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यातच मुख्य चुरस होती. सतेज पाटील यांच्या नेतृत्वात समविचारी आघाडी तर मुश्रीफ यांच्या नेतृत्वात महायुती लढत होती. या निवडणुकीत 99 टक्के मतदान झालं होतं. 25 जागांसाठी मतमोजणी सुरू झाली तेव्हा प्रत्येकाच्या मनात धाकधूक होतं. मात्र, या निवडणुकीच्या निकालाने सर्वांनाच धक्का बसला. निवडणुकीत समविचारी आघाडीचे 13 उमेदवार निवडून आले. महायुतीचे 12 उमेदवार निवडून आले. प्रमुख पराभूतांमध्ये माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, विश्वास नारायण पाटील आणि गोकुळचे विद्यमान चेअरमन नाविद मुश्रीफ यांचा समावेश आहे.

Follow Us
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!
लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईचा ताबा मिळणार? मुंबई पोलिसांना...
लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईचा ताबा मिळणार? मुंबई पोलिसांना केंद्राच्या परवानगीची प्रतीक्षा!
दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं! 2 टन फुलांनी...
दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं! 2 टन फुलांनी सजलेला गाभारा पाहून भाविक मंत्रमुग्ध
सिंधुताई सपकाळ यांच्या मुलाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा; प्रकरण समोर
सिंधुताई सपकाळ यांच्या मुलाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा; प्रकरण समोर येताच खळबळ
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?