
पुणे – आंतराष्ट्रीय सराफा बाजारपेठ व भारतीय सराफा बाजारपेठेत सोन्यां चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढउतार होताना दिसून येत आहेत.याचा परिणाम देशांर्गत स्थानिक सोन्याच्या बाजारांवरही होत आहे. गेल्या दोन महिन्यापासून सोन्यांच्या दरामध्ये सतत घसरण होताना दिसून येत आहे. दिवाळीच्या दरम्यान सोन्याच्या दरामध्ये किंचित वाढ झाली होती. मात्र पुढील दोन दिवसात दर पुन्हा घसरला. आज (गुरुवार) सोन्या चांदीच्या भावामध्ये घसरण झाली आहे. दोन्हीचे भाव उतरले आहेत. यात 10 ग्रॅम म्हणजे 22 कॅरेट सोन्याचा भाव 47,620 रुपये आहे. तर चांदीची किंमत 62,600 प्रतिकिलो आहे.
गतवर्षी 2020 मध्ये सोन्याच्या दर 50 हजारांच्याही वरती होता. मात्र सद्यस्थितीला सोन्याच्या किंमती48,000इतक्याही नसल्याचे दिसून आले आहे. सोन्याच्या दरामध्ये झालेली घसरण ही सर्वसामान्य नागरिकांसाठी चांगली संधी आहे. दरामध्ये झालेली घसरणीमुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास चांगली संधी आहे.
पारंपरिक दागिन्यांच्या खरेदीकडे कल
तुळशी विवाहानंतर लग्नाचे मुर्हत असल्याने अनेक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जात आहे. दागिन्यांची खरेदी करताना जुनं ते सोन म्हणतं पारंपरिक पद्धतीचे दागिने खरेदीचा कल वाढत आहे. आई , आजी च्या काळात असलेले दागिनिच्या डिझाईन्स तसेच इतर प्रकारचे दागिने खरेदी करण्यावर भर दिला जात आहे. महिलांमध्ये या पद्धतीचे दागिने आधिक खरेदी केले जात आहेत.
आजचे दर
22 कॅरेट सोने 47,620
24 कॅरेट सोने 49, 420
जुने ATM कार्ड कालबाह्य होऊनही नवे कार्ड घरी पोहोचले नाही, मग करायचे काय?
आगामी सुनावणीपर्यंत मलिक सोशल मीडियावर वानखेडे कुटुंबियांबाबत काहीही पोस्ट करणार नाहीत- दिवाकर राय