AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शशिकांत शिंदेंच्या लेखावर तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, सगळंच सांगितलं, विलीनीकरणाबाबत मोठं विधान

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या साप्ताहिकामध्ये एक लेख लिहिला आहे, त्यामध्ये त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात मोठा दावा केला आहे. यावर आता तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

शशिकांत शिंदेंच्या लेखावर तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, सगळंच सांगितलं, विलीनीकरणाबाबत मोठं विधान
sunil tatkare Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 13, 2026 | 4:50 PM
Share

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या साप्ताहिकामध्ये एक लेख लिहिला आहे, या लेखामध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात मोठा दावा केला आहे. विलीनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवार यांच्याकडेच देणार होतो, पण अजित पवार यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं, आता अजितदादांचं हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असं शशिकांत शिंदे यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. तसेच अदृश्य शक्तिच्या कारवायामुळे राष्ट्रवादीमधून बाहेर पडून अजित पवार यांना वेगळा गट स्थापन करावा लागला, मात्र झालेली चूक दुरुस्त करायची या विचाराने गेल्या चार ते पाच महिन्यांपासून दादा कामाला लागले होते, असा मोठा दावा देखील या लेखात शिंदे यांनी केला आहे.

दरम्यान शिंदे यांच्या या लेखावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी शशिकांत शिंदे याचा हा दावा फेटाळून लावतानाच त्यांना इशारा देखील दिला आहे. ‘अशावेळी शशिकांत शिंदेंनी असं विधान करायला नको होतं. भाजपसोबत असलं पाहिजे ही दादांची अनेक वर्षापासूनची इच्छा होती.  २०१४मध्ये होती. २०१६ मध्ये देखील इच्छा होती. त्यावेळी चर्चा अंतिम टप्प्यात झाली होती. २०१९ मध्ये तर भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थिर राहू शकतं. केंद्राची मदत होऊ शकते असं दादांनी म्हटलं होतं. त्यामुळे शशिकांत शिंदेंनी म्हटलं ते अनाठायी आहे. ते वेगळं काही तरी साधू पाहत आहेत. त्यांना नेमकं काय बोलायचं त्यांचं त्यांना माहीत. ते जबाबदार नेते आहेत. पण हे लिहिण्याचं कारण काय? असा सवाल यावर आता तटकरे यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादीचे मासिक दर महिन्याला येतं. पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मासिक येतं. योगायोगाने ते १२ तारखेला आलं की मुद्दाम १२ तारखेला मासिक बाजारात आलं माहीत नाही, असंही यावेळी तटकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान शशिकांत शिंदेंनी काहीही बोलू नये. अमूक अमूक कारणानं किंवा वैतागून अजितदादांनी निर्णय घेतला असं ते म्हणत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना योग्य त्या पद्धतीने उत्तर देईन, असा इशाराही यावेळी तटकरे यांनी शशिकांत शिंदे यांना दिला आहे. तसेच विलीनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना समोरून प्रस्ताव आला तर चर्चा करू असंही यावेळी तटकरे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...