Dattatraya Bharne | ‘या’ कारणासाठी ग्रामस्थांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोड्यावरून काढली मिरवणूक

डिकसळ या गावी 4 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने मंत्री भरणे त्याठिकाणी गेले असता ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक करत मिरवणूक काढली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांची ही घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली.

Dattatraya Bharne | 'या' कारणासाठी ग्रामस्थांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोड्यावरून काढली मिरवणूक
Dattatray BharneImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 6:51 PM

इंदापूर – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Minister of State Dattatraya bharne) आपल्यास सहज,साधेपणाने वागण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर आपल्या कामाच्या बाबतीतही जाते अधिक सजग असलेल्या पहिली मिळतात. यामुळेच ते ग्रामीण भागात ते प्रसिद्ध आहेत. अनेकदा छोट्यात छोट्या कार्यकर्त्यालाही दत्तात्रय मामा आपले वाटतात. असाच प्रसंग इंदापूर(Indapur)  तालुक्यातील डिकसळ येथे घडला आहे. इंदापूर तालुक्यातील डिकसळ (Diksal)येथे गावच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे खूष झालेल्या गावकऱ्यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोड्यावरून मिरवणूक काढली आहे. ग्रामस्थांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच आज हलगीच्या निनादात घोड्यावरुन जंगी मिरवणूक काढली. डिकसळ या गावी 4 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने मंत्री भरणे त्याठिकाणी गेले असता ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक करत मिरवणूक काढली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांची ही घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली.

मटणावर मारला ताव काही दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यातील निरवांगी या गावी 30 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभसाठी ते गेले होते . त्यावेळी जेवणचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी गावकऱ्यांच्या पंगती बसल्या होत्या व उपस्थित पदाधिकाऱ्यांना जेवणासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. मात्र राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चक्क गावकऱ्यांच्या सोबत पंगतीत बसून जेवणाचा आस्वाद घेतला. यामुळे भरणे यांचा साधेपणा पुन्हा समोर आला आहे.

रशिया-यूक्रेनवरची आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी, यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदींकडे मदत मागितली, झेलेन्स्किचं ट्विट

PHOTO: कधी काळी आपल्या सौंदर्यानं भुरळ पाडणाऱ्या युक्रेनमध्ये आता आहे तो फक्त विध्वंस; कुठे लहान मुलं भीतीनं गारठून गेली आहेत, तर कुठे इमारती छिन्न विच्छन्न…

IPL 2022: महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांचं स्टेडियमवरील IPL सामन्यांसंदर्भात महत्त्वाचं विधान

Non Stop LIVE Update
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक.
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?.
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?.
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य.
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन.
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.