पाहा video| हातात भगवा धरत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील डीजेवर थिरकले !

इंदापूर शहर व तालुक्यात शिवजयंतीनिमित्त राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अनेक ठिकाणी उपस्थित राहून शिवजयंती सोहळा साजरे केले. मात्र हे दोघे शिवजयंतीनिमित्त कुठेही एकाच व्यासपीठावर पाहावयास मिळाले नाहीत, मात्र अनेक ठिकाणी त्यांनी त्यांच्या वेळेनुसार शिवजयंती समारंभास हजेरी लावली.

पाहा video|  हातात भगवा धरत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील डीजेवर थिरकले !
harshawardh patil
राहुल ढवळे

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Feb 20, 2022 | 3:21 PM

इंदापूर- शिवजयंतीनिमित्त राज्यमंत्री दत्तात्रय भरणे(मामा) (Minister of State Dattatraya bharne) यांचा डान्स व त्यानंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील(भाऊ) (Harshvardhan Patil)यांचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियात(Social Media) व्हायरल होत आहेत. वालचंदनगर येथील शिवजयंतीमध्ये वेगवेगळ्या वेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहहा खातर या दोघंनीही डान्स केला. या डान्सचा व्हिडीओ अल्पावधीटच सोशल मीडियावर व्हायरल झाला. या डान्सच्या वेळी दोघांच्या हातात या वेळी होता भगवा झेंडा असल्याचे दिसून आले. काही दिवसांपूर्वी विकास कामाच्या उद्घाटनासाठी गेले असताना दत्तात्रय भरणे(मामा) यांनी गावकऱ्यांच्या सोबत पंगतीत बसत मटणावर ताव मारल्याचा व्हिडीओ समोर आलं होता. आपल्या सध्या राहणीमानामुळं व सहजपणे कार्यकर्त्यांना आपलेसे करण्याच्या शैलीमुळे भरणेमामा प्रसिद्ध आहेत.

शिवजयंतीच्या कार्यक्रमानालवाली हजेरी इंदापूर शहर व तालुक्यात शिवजयंतीनिमित्त राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अनेक ठिकाणी उपस्थित राहून शिवजयंती सोहळा साजरे केले. मात्र हे दोघे शिवजयंतीनिमित्त कुठेही एकाच व्यासपीठावर पाहावयास मिळाले नाहीत, मात्र अनेक ठिकाणी त्यांनी त्यांच्या वेळेनुसार शिवजयंती समारंभास हजेरी लावली. इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील शिवजयंती मध्ये रात्री ८:२० च्या दरम्यान कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला होता, कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री भरणे यांना खांद्यावर घेत डीजेच्या तालावर नाचविले. यावेळी भरणे यांनी हातात भगवा झेंडा घेऊन ठेका धरला.

कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव माजी मंत्री पाटील यांनीही

याच ठिकाणी नंतर काही वेळानंतर म्हणजे नऊ वाजण्याच्या सुमारास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या शिवजयंती समारंभास उपस्थित राहिले होते, या वेळी तेथील कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव माजी मंत्री पाटील यांनीही डीजेच्या तालावर ठेका धरला होता, पाटील यांनाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी खांद्यावरती घेत डीजेच्या तालावर नाचविले.. त्यानी ही भगवा झेंडा हातात घेऊन ठेका धरला होता. अशा पद्धतीने आजी-माजी मंत्र्यांचा डीजे वरचा वेगवेगळ्या वेळी झालेला डान्स सध्या इंदापूर शहर व तालुक्यात सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहेत.

Skin care : ब्लीचिंग करण्यापूर्वी ‘या’ अत्यंत महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा!

सावधान! सापासोबत असा खेळ जीवावर बेतू शकतो; पाहा, या मुलीसोबत काय घडलं? Snake video viral

सावधान! सापासोबत असा खेळ जीवावर बेतू शकतो; पाहा, या मुलीसोबत काय घडलं? Snake video viral

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें