…तेव्हा गौतमीला दोन वेळचे जेवण द्यायला कोणी गेले होते का? अमोल कोल्हे यांनी त्या लोकांना फटकारले

| Updated on: May 30, 2023 | 8:26 AM

Gautami Patil : गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांवर एकीकडे बंदी घालण्याची मागणी होत आहे. तिच्या आडनावावरुन वाद सुरु आहे. तिच्या कार्यक्रमाचा मानधनाचा विषय उपस्थित केला जातोय, या सर्व लोकांना खासदार अमोल कोल्हे यांनी फटकारले.

...तेव्हा गौतमीला दोन वेळचे जेवण द्यायला कोणी गेले होते का? अमोल कोल्हे यांनी त्या लोकांना फटकारले
Gautami Patil
Follow us on

सुनिल थिगळे, पुणे : नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या संदर्भात विविध वाद निर्माण केले जात आहे. कधी तिच्या मानधनावरुन वाद केला जातो, तर कोणी तिच्या आडनावावरुन वाद सुरु केला आहे. तिच्या कार्यक्रमांना बंदी घालण्याची मागणी केली जातेय.. गौतमी पाटील गरीब परिस्थितीमधून पुढे आलीय. तिला संपवू नका, असे आवाहन करताना अमोल कोल्हे यांनी समाजातील ठेकेदारांना चार खडे बोलही सुनावलेय.

काय म्हणाले अमोल कोल्हे

लावणी नृत्यांगना म्हणून गौतमी पाटील हिची क्रेझ निर्माण झाली आहे. परंतु कला क्षेत्रामध्ये मिळत असलेले यश कधीच कायमस्वरुपी नसते. आज तिच्यासंदर्भात जे होत आहे, ते प्रत्येक कलाकाराच्या बाबती होत असतं. आज गौतमी पाटील यशाच्या शिखरावर आहे. कलाकार म्हणून ती तिची कला सादर करत आहे. तो तिचा व्यवसाय आहे. यामुळे तिला अकारण ट्रोल करण्यापेक्षा तिची कुचंबणा होऊ नये, अशी काळजी घ्या, असे आवाहन अमोल कोल्हे यांनी केले.

हे सुद्धा वाचा

तेव्हा कोण आले होते…

खासदार अमोल कोल्हे यांनी समाजातील ठेकेदारांनाही चार बोल सुनावले आहे. ते म्हणाले की, गौतमीला यशाची फिज आहे, ती पचवण्यासाठी समाजाने तिला मदत करावी. तिचे वय खूप लहान आहे. ग्रामीण भागातील तरुण आज तिच्यावर फिदा झाले आहेत. तिच्या कार्यक्रमांना प्रंचड गर्दी होतेय. परंतु ज्यावेळी गौतमी परिस्थीत हलाखीची होती तेव्हा दोन वेळचे जेवण द्यायला यातला कोणी गेलं नाही. आज ती तिच्या कर्तुत्वावर आणि कलेवर पुढे जाते तेव्हा कोणाच्या पोटात दुखण्याची काय कारण आहे? असा प्रश्न कोल्हे यांनी उपस्थित केला.

सुरुवातीच्या काळात गौतमीच्या कार्यक्रमांवर विशेषत: तिच्या डान्सवर आक्षेप घेण्यात आला होता. गौतमी अश्लील अदा करत असल्याची टीका झाली होती. त्यावेळी तिने स्वत:हून माफीही मागितली होती. त्यानंतर तिने अश्लील हावभाव वाटणाऱ्या स्टेप्स करणं टाळण्यास सुरुवात केली. तरीही तिच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी काही थांबली नाही आणि थांबताना दिसत नाही. त्यावर अमोल कोल्हे यांनी सर्वांना उत्तर दिले आहे.

शिरूरचे तीन प्रश्न

यावेळी अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदार संघातील तीन महत्वाचे प्रश्न प्रलंबित होते, त्यावर मत व्यक्त केले. ते म्हणाले, पुणे-नाशिक महामार्ग, बैलगाडा शर्यत आणि पुणे नाशिक रेल्वे हे महत्वाचे मुद्दे होते त्यापैकी २ पूर्ण तत्वावर आहे. मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे हे झाले आहे. मतदारांनी टाकलेली जबाबदारी होती. ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली.