Gopichand Padalkar : खोतांच्या ‘उधारी’नंतर आता पडळकरांच्या ‘देणगी’ची प्रतीक्षा, हरी नरके म्हणतात, दीड वर्ष झाली!

| Updated on: Jun 20, 2022 | 6:05 PM

फेसबुक पोस्टमध्ये त्यांना पडळकर आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या या 'देणगी'प्रकरणावर प्रकाश टाकला. नेत्यांची बोलबच्चनगिरी असेही त्यांनी यात म्हटले आहे.

Gopichand Padalkar : खोतांच्या उधारीनंतर आता पडळकरांच्या देणगीची प्रतीक्षा, हरी नरके म्हणतात, दीड वर्ष झाली!
पुस्तक प्रकाशन समारंभात उपस्थित हरी नरके, गोपीचंद पडळकर आदी
Image Credit source: Facebook
Follow us on

पुणे : संजय सोनवणी हे सिद्धहस्त लेखक असून त्यांचे होळकर घराण्याच्या इतिहासावर भरपूर काम आहे. त्यांच्या एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) पुन्हा भेटले. अनेक अडचणींमधून हे पुस्तक प्रकाशित केल्याचे बघून पडळकर यांनी उत्स्फूर्तपणे पुस्तकाच्या प्रकाशनाचा खर्च आपण देणगी म्हणून देत असल्याची उत्स्फूर्त घोषणा केली. लोकांनी टाळ्यांचा कडकडाड केला. पुढे एक वर्ष उलटून गेले पण प्रकाशकांना पडळकर यांच्याकडून एक रुपयाही मिळाला नाही, असे मत हरी नरके (Hari Narke) यांनी मांडले आहे. फेसबुक पोस्टमध्ये त्यांना पडळकर आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या या ‘देणगी’प्रकरणावर प्रकाश टाकला. नेत्यांची बोलबच्चनगिरी असेही त्यांनी यात म्हटले आहे. सुरुवातीलाच ते म्हणतात, की आमदार गोपीचंद पडळकर हे कायम प्रसिद्धीच्या झोतात असतात. ते राष्ट्रीय समाज पक्षात असताना मानदेशातील एका राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात आमची भेट आणि ओळख झाली.

‘…यालाही आता सहा महिने झाली’

या कार्यक्रमाला ऋषितूल्य राजकीय नेते गणपतराव देशमुखही उपस्थित होते. पुढे पडळकर व्हाया वंचित बहुजन आघाडी भाजपामध्ये गेले. त्यांना विधानपरिषद मिळाली. लेखक संजय सोनवणींच्या एका पुस्तक प्रकाशन समारंभात ते भेटले. या समारंभात त्यांनी पुस्तक प्रकाशनाचा खर्च देणगी म्हणून देत असल्याची घोषणा केली होती. ती आजतागायत पूर्ण झालेली नाही. मध्यंतरी एका वाहिनीच्या कार्यालयात त्यांची अचानक भेट झाली. मी त्यांना या पुस्तकाच्या देणगीची आठवण करून दिली. आठवड्यात पूर्तता करतो असे, ते म्हणाले. यालाही आता सहा महिने झाले.

‘तेच लेखकाकडे भेट प्रत मागायला आले’

गोपीचंद पडळकर यांच्या या प्रकरणावरून एका नेत्यांची आठवण झाली. अशाच एका पुस्तक प्रकाशनाच्या आधी आपण त्याच्या पाच हजार प्रती आगाऊ नोंदणी करून खरेदी करू, असे ते लेखक, प्रकाशकांना म्हणाले. प्रत्यक्ष कार्यक्रमात सभागृहाबाहेर पुस्तक विक्री चालू असताना त्याची एकही प्रत त्यांनी विकत घेतली नाही. उलट तेच लेखकाकडे भेट प्रत मागायला आले. तेव्हा मी त्यांना, पाच हजार प्रती घेण्याचे काय झाले असे विचारले तेव्हा ते म्हणाले, उद्यापरवा घेतो. तो नंतर कधी उगवलाच नाही. या घोषणेचा आणखी एक तोटा असा झाला की काही कार्यकर्त्यांनी प्रत्येकी दहादहा प्रती खरेदी करून राज्यात व बाहेर अगदी विदेशातही हे पुस्तक पाठवण्याचे ठरवले होते. त्यांना वाटले काम झाले.

हे सुद्धा वाचा

‘प्रकाशक कर्जातच राहिला’

आमदार पडळकर यांनी आर्थिक भार उचलला आता आपण प्रती नाही घेतल्या तरी चालतील. पडळकर पैसे देणार म्हणून प्रकाशकांनी ऑनलाइनवर फ्री डाऊनलोडसाठी पुस्तक उपलब्ध करून दिले. देशविदेशातील 65 हजार ग्रंथप्रेमींनी ते डाऊनलोड करून घेतले. पण प्रकाशक कर्जातच राहिला. यावरून दुसऱ्या एका बोलबच्चन नेत्यांची आठवण झाली. अशाच एका पुस्तक प्रकाशनाच्या आधी आपण त्याच्या 5 हजार प्रती आगाऊ नोंदणी करून खरेदी करू, असे ते लेखक, प्रकाशकांना म्हणाले. प्रत्यक्ष कार्यक्रमात सभागृहाबाहेर पुस्तक विक्री चालू असताना त्याची एकही प्रत त्यांनी विकत घेतली नाही. उलट तेच लेखकाकडे भेट प्रत मागायला आले. तेव्हा मी त्यांना पाच हजार प्रती घेण्याचे काय झाले असे विचारले, तेव्हा ते म्हणाले, उद्यापरवा घेतो. तो उद्यापरवा नंतर कधी उगवलाच नाही.