शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता, IMD ने स्कायमेटचा अंदाज खोडला, यंदा मॉन्सून कसा असेल वाचा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने यंदा देशात मान्सून सामान्य राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यंदा देशात 96 टक्के पाऊस पडणार आहे. यापूर्वी स्कायमेटने वेगळा अंदाज काढला होता. परंतु तो आयएमडीने खोडला आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता, IMD ने स्कायमेटचा अंदाज खोडला, यंदा मॉन्सून कसा असेल वाचा
farmer
| Updated on: Apr 11, 2023 | 3:39 PM

पुणे : मार्च आणि एप्रिल महिन्यातील गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. परंतु शेतकरी हार न मानता पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतो. रब्बी नंतर खरीप आणि खरीप नंतर रब्बीची त्याला आशा असते.  बळीराजाला स्कायमेट या संस्थेने मॉन्सूनचा व्यक्त अंदाजामुळे धक्का बसला होता. परंतु आता भारतीय हवामान विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. यंदा देशात मान्सून कसा असणार आहे? याबाबत भारतीय हवामान विभागाचा पहिला अंदाज आला आहे. हा अंदाज स्कायमेट या संस्थेच्या अंदाजाच्या विरुद्ध आहे.

देशात कसा असणार मॉन्सून

यंदा भारतात मान्सून सामान्य असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केला. यंदा देशात मान्सून साधारण म्हणजे 96 टक्के असणार आहे. आयएमडीने 1951 ते 2022 या मान्सून मॉडेलचा अभ्यास करून हा अंदाज वर्तवला आहे. जर देशात 90 ते 95 टक्के पाऊस झाला तर तो सामान्यपेक्षा कमी समजला जातो. 96 ते 104 टक्के हा सामान्य पाऊस आहे. जर 110 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला तर जास्त पाऊस असतो. 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला तर दुष्काळ समजला जातो.

पुढील अंदाज केव्हा


मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयएमडीचा नवा अंदाज येणार आहे. त्यावेळी अल नीनोच्या परिणामासंदर्भात बोलता येणार आहे. अल नीनो असणार आहे, परंतु त्याचा मोठा प्रभाव नसेल. भारतात जुलै महिन्यात अल निनो सक्रिय होत आहे. परंतु आजवर 15 वेळा अल नीनो सक्रिय असताना मान्सून 6 वेळा अतिवृष्टी देऊन गेला आहे. अन्यथा तो साधारण पाऊस देऊन गेला. अल नीनो चा मान्सूनशी 40% संबध गृहीत धरला जातो.

अल निनो म्हणजे काय?

अल निनो हा जलवायू प्रणालीचा एक भाग आहे. हवामानावर त्याचा परिणाम होतो. अल निनोची परिस्थिती साधारणपणे दर तीन ते सहा वर्षांनी उद्भवते. पूर्व आणि मध्य विषुववृत्ताला प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावर पाणी सामान्यापेक्षा गरम होते तेव्हा त्याला अल निनो म्हणतात. एल निनोच्या या परिस्थितीमुळे वाऱ्याची पद्धत बदलते आणि त्यामुळे जगाच्या अनेक भागांमध्ये हवामानावर परिणाम होतो.

यापुर्वी कधी होता अल निनो

यापुर्वी २००४, २००९, २०१४ व २०१८ मध्ये अल निनोचा अंदाज होता. या सर्व वर्षांत देशात दुष्काळ पडला.तोच अंदाज २०२३ मध्ये आहे.

हे ही वाचा


गारपीट, अवकाळीनंतर बळीराजापुढे पुन्हा संकट, आता स्कायमेटच्या अंदाजाने वाढवली चिंता