Pune : ‘अफजल खान, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत’, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य

| Updated on: Feb 03, 2023 | 9:13 PM

"अफजल खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना! तुम्ही मुलांचा इतिहास काढल्यावर कसं चालेल", असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलंय.

Pune : अफजल खान, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य
जितेंद्र आव्हाड
Follow us on

पुणे : “अफजल खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना! तुम्ही मुलांचा इतिहास काढल्यावर कसं चालेल”, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलंय. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. “तुम्ही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला मुस्लिम वस्त्यांमध्ये जाऊन बघा, किती उत्साहाचे वातावरण असते. मुसलमान वस्तीत उत्साह असतो. त्यांच्या मनात भीती असते अस्तित्वाची. त्यांना सिद्ध करावं लागतं की ते भारतीय आहेत किती वर्ष त्यांच्याकडे पुरावा मागणार?”, असा सवाल त्यांनी केला.

“त्यांनी पुरावा दिला ना, जिना यांनी पाकिस्तान काढला आणि यांनी सांगितलं की आम्ही पाकिस्तानात नाही येणार हा आमचा देश आहे. त्यांना कसले कागदी पुरावे मागत आहेत? त्यांनी पुरावा दिला आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“महाराष्ट्रात वृत्तपत्रावर बंदी येत आहे. टीव्ही चॅनल विकत घेतली जात आहेत. खऱ्या बातम्या तुमच्यापर्यंत येऊच दिल्या जात नाहीत. भारत जोडो यात्रेच कवरेज दिलं नाही. पण सोशल मीडियाने या मिडियाची वाट लावली”, असं आव्हाड म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“काँग्रेस नेते राहुल गांधी घराघरात पोहोचले. राहुल गांधी यांच्याकडे बघितलं की असं वाटतं गांधी कभी मरते नहीं. देश चालवायला एक नेता लागतो”, असंदेखील आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काय म्हणाले?

“हे व्यासपीठ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळालं आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर हे सूत्र उद्ध्वस्त करण्याचं काम काही लोक करत आहेत. हा सगळा सांस्कृतिक दहशतवाद आहे”, असं मत त्यांनी मांडलं.

“अजित पवार छत्रपती संभाजी राजेंना काय म्हणाले? यावर महाराष्ट्र पेटला आणि मग आम्हाला सांगावं लागलं की दादोजी कोंडदेव महाराजांचा गुरू नव्हता, असा दावा त्यांनी केला.

“Francis Martin याने संभाजी महाराजांच्या मृत्यूबद्दल काहीतरी लिहून ठेवलंय. मला नवा वाद उकरून काढायचा नाही म्हणून इथेच थांबतो. पण संभाजी महाराजांना कुणी मारले?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

“स्वतःच्या घरात जर गद्दारी झाली तर काय करणार माणूस? जसं संभाजी महाराज यांना समजायला लागलं तसं शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील लोकांची डोकी फिरायला लागली. संभाजी महाराज आणि अष्टमंडळ यांच्यात गैरसमज झाले”, असं आव्हाड म्हणाले.

“कुठल्याही इतिहासकाराला शिवाजी महाराजांच्या मृत्यूचे कारण सांगता आले नाही. मोरोपंत पिंगळे यांच्या जागेवर संभाजी महाराज यांनी विवोपंत यांना पद दिलं”, असं आव्हाड म्हणाले.

“औरंगजेब आणि राजपूत यांच्यात भांडणं व्हायला लागली. संभाजी महाराज आग्राला होते तेव्हा अकबर आणि संभाजी यांची भेट झाली. अकबरला वाटले संभाजी महाराज मला औरंगजेबपासून वाचवतील”, असं आव्हाड म्हणाले.

“शिकलेले सवरलेले संभाजी महाराज शिवाजी महाराजांपेक्षा चांगले राजे झाले असते”, असं मत त्यांनी मांडलं.

“वटपौर्णिमेला सात फेरे घालण्यापेक्षा घरात महात्मा फुलेंचा आणि सावित्रीबाईंचा फोटो लावा. आपण आपला देश हिंदू-पाकिस्तान करत आहोत. हे आपल्याला कळतच नाही. हिंदू जन आक्रोश काढायला आपला हिंदू घाबरला आहे का?”, असा सवाल त्यांनी केला.

“पहिली शिवजयंती महत्मा ज्योतिबा फुले यांनी साजरी केली. रायगडावरील महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढली”, असं आव्हाडांनी सांगितलं.

“टिळकांचा आणि शाहू महाराजांचा वाद सुरू झाला. पण पुणेकारांनो लक्षात ठेवा FC कॉलेज टिळकांनी नाही आणलं तर त्याला जागा शाहू महाराजांनी दिली”,  असं आव्हाड म्हणाले.