AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Corona alert mode| पुणे महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर ; कोणत्याही क्षणी सुरु होणार जम्बो कोविड सेंटर

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तसेच वाढत धोका लक्षात घेत महापालिकेने कोरोनाची नियमावली कडक केली आहे. मात्र पुणेकरांकडून या नियमांना हरताळ फासण्याचे काम केले जात असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येत आहे. शहारातील महत्वाची बाजार पेठ असलेल्या छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये नागरिकांची भाजीपाला खरेदीसाठी गर्दी जमली होती.

Pune Corona alert mode| पुणे महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर ; कोणत्याही क्षणी सुरु होणार जम्बो कोविड सेंटर
Jambo covid center
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jan 06, 2022 | 11:55 AM
Share

पुणे- शहरातील वाढती कोरोनाची रुग्णसंख्यनेमुळे महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. शहरात कोरोनाची रुग्णसंख्या 100  वरून 1800 वर पोहचली आहे. मात्र रुग्णसंख्या वाढत असली तरी नागरिक आद्यपाही बेफिकिरीने वागताना दिसून येत आहेत. ओमिक्रॉन व कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहारातील कोरोनाचे निर्बंधही कडक करण्यात आले आहेत. रुग्णसंख्येची स्थिती लक्षात घेता , गरज भासल्यास कोणत्याही क्षणी शहरातील जम्बो कोविड सेंटर सुरु करण्याची तयारी महापालिकेने दर्शवली आहे.

जम्बो कोविड सेंटरची सद्यस्थिती

कोरोना काळात शहरात 800 बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले होते. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर काही काळ जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात आले होते. मात्र ओमिक्रॉनचे रुग्ण सापडल्यानंतर पुन्हा एकदा जम्बो कोविड सेंटरची साफ सफाई व डागडुजी करण्यात आली. सद्यस्थितीला जम्बो कोविड सेंटरमध्ये 200 बेड सुज्ज करण्यात आले आहेत. आयसीयू वार्डही पूर्णपणे तयार करण्यात आले आहेत. या जम्बो कोविड सेंटरमध्ये जनरल वार्ड तयार ठेवण्यात आले आहेत.

 नागरिकांकडून  नियमांना हरताळ कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तसेच वाढत धोका लक्षात घेत महापालिकेने कोरोनाची नियमावली कडक केली आहे. मात्र पुणेकरांकडून या नियमांना हरताळ फासण्याचे काम केले जात असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येत आहे. शहारातील महत्वाची बाजार पेठ असलेल्या छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये नागरिकांची भाजीपाला खरेदीसाठी गर्दी जमली होती. यामध्ये मास्क. सोशल डिस्टन्सचे पालन न करता सर्रासपणे खरेदी केली जात होती. नागरिकांबरोबरच घाऊक विक्रत्यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी गर्दी निर्माण झाली होती. याप्रकारच्या बेशिस्त गर्दीमुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत नाही ना अशी स्थिती निर्माण झाली आहे.

हॉटेलवर कारवाई

महापालिकेने घालून दिलेल्या कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी चा हॉटेलवर करवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंढवा परिसरात चार मोठ्या हॉटेलमध्ये पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. घटना स्थळी घाट पोलिसांनी स्वतः साऊंड सिस्टिम केली बंद केली. कोरोनाच्या नियमावली बाबत हॉटेल मालकांना वेळोवेळी सूचना दिल्या होत्या, तरी अनेक ठिकाणी नियमावली पायदळी तुडवली जात असल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या नव्य नियमावलीबाबत हॉटेल मालकांची बैठक घेऊन माहिती देण्यात आली होती तरी उल्लंघन झाल्याने कारवाई करण्यात आली.

Aurangabad | औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात 61 व्हेंटिलेटर बंद

Buldana :राजमाता जिजाऊ जन्मोत्सवावर कोरोना ओमिक्रॉनचं सावट, 50 जणांच्या उपस्थितीला परवानगी, नियमावली जारी

Aurangabad: विनामास्क फिरताय? तुमचे वाहन Black list मध्ये जाऊ शकते, वाचा किती वाहनधारकांना नोटीस?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली