Buldana : राजमाता जिजाऊ जन्मोत्सवावर कोरोना ओमिक्रॉनचं सावट, 50 जणांच्या उपस्थितीला परवानगी, नियमावली जारी

राज्यात काल 26 हजार कोरोना रुग्णांची नोंद झालीय. बुलडाणा जिल्ह्यात 9 कोरोना रुग्णांची नोंद झालीय. तर सक्रिय रुग्णसंख्या 33 वर पोहोचलीय.

Buldana : राजमाता जिजाऊ जन्मोत्सवावर कोरोना ओमिक्रॉनचं सावट, 50 जणांच्या उपस्थितीला परवानगी, नियमावली जारी
Jijau Janmotsav
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 11:56 AM

बुलडाणा : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. राज्यात काल 26 हजार कोरोना रुग्णांची नोंद झालीय. बुलडाणा जिल्ह्यात 9 कोरोना रुग्णांची नोंद झालीय. तर सक्रिय रुग्णसंख्या 33 वर पोहोचलीय. बुलडाणा जिल्हा प्रशासनानं राजमाता जिजाऊ जन्मोत्सवासाठी अटी व शर्तीसंह 50 लोकांनाच परवानगी दिलीय. ओमिक्रॉन आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावट जिजाऊ जन्मोत्सवावर आहे. केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत जन्मोत्सव साजरा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे.

जिजाऊ जन्मोत्सवावर सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचं सावट,

12 जानेवारी रोजी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे साजरा होणारा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा ओमिक्रॉन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये साजरा होतोय. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी अटी व शर्तींवर फक्त 50 लोकांनाच सोहळ्यासाठी उपस्थित राहणायची परवानगी देण्यात आलीय. यावर्षी सुद्धा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा हा मोठ्या प्रमाणात साजरा होणार नसल्यानं शिवप्रेमींचा हिरमोड झालाय.

सहभागी होणाऱ्यांना आरटीपीसीआर रिपोर्ट आवश्यक

बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा येथील जिजाऊ जन्मोत्सव सोहळा हा दरवर्षी १२ जानेवारीला मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. मात्र,यावर्षी ओमिक्रॉन आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर सोहळयाला फक्त 50 लोकानांच सोहळ्यासाठी उपस्थित राहणायची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिलीय. जन्मोत्सवाच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना ओळखपत्र आवश्यक असून प्रत्येक व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आलेली असणं आवश्यक आहे. आरटीपीसीआरचा अहवाल 48 तासांमधील असावा, अशा सूचना देण्यात आल्यात आहेत.

कोरोना लसीकरण आवश्यक

राजमाता जिजाऊ जन्मोत्सवात सहभागी होणाऱ्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोज घेतलेले असणं आवश्यक आहे. कार्यक्रमात कोरोनाचे सर्व नियम पाळणे आवश्यक आहेत. या अटी व शर्तीवर जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलीय. त्यामुळे यंदाचा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे.

इतर बातम्या:

दिवसाला 25 हजार रुग्ण आले तर काय करणार?, बेडपासून औषधांपर्यंतचा मुंबई महापालिकेचा अ‍ॅक्शन प्लान तयार

भीतीची लाटही नको, का? राज्यातली ही तुलनात्मक आकडेवारी नेमकं काय सांगते?

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : पुणे महापालिका वाढत्या रुग्णसंख्येमुळं अलर्ट मोडवर

Buldana Administration gave permission to Rajmata Jijau Birth Anniversary at Sindhkhed Raja with only 50 people attendance due to corona

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.